Heist in Apple Store : अॅपल सारखा महागडा फोन विकत घ्यावा आणि तो चोरीला गेला तर आपली काय अवस्था होईल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. मात्र अमेरिकेमध्ये खुद्द अॅपलच्या स्टोरवरच चोरांनी डल्ला मारून कोट्यवधीची चोरी केलीेए. तब्बल 4 कोटी किंमतीच्या अॅपल प्रॉडक्सची चोरीची घटना घडलीए. चोरांनी ज्या पद्धतीने ही चोरी केली त्याबद्दल सगळ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही घटना घडलीए अमेरिकेतल्या लीनवूड येथील एलडरवूड मॉलमध्ये.
किती किमतीची चोरी झाले?
एलडरवूड मॉलमधल्या या अॅपल स्टोरमधून चोरांनी एकुण 436 अॅपल प्रोडक्सची चोरी केलीये. यामध्ये आयफोन्स, अॅपल वॉच आणि आयपॅडचा समावेश आहे. भारतीय चलनानुसार तब्बल 4 कोटी किंमतीच्या वस्तुची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
कशी घडली घटना?
चोरांनी पहिली एलडरवूड मॉलमधल्या सीएटल कॉफी शॉपचं कुलूप तोडुन कॉफीच्या बाथरूममध्ये गेले. कॉफीशॉपच्या बाथरूममधली त्यांनी भिंत फोडुन मोठं भगदाड केलं आणि तिकडून त्यांनी अॅपलच्या स्टोरमध्ये प्रवेश केला.
या घटनेनंतर सीएटल कॉफी शॉपचे मालक एरिक मार्क यांनी या संबंधित ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “या मॅलमध्ये अॅपल स्टोर माझ्या कॉफी शॉपच्या एवढ्या जवळ होतं हे मला माहितच नव्हतं. चोरांनी खूपचं डिटेल प्लॅनिंग करून ही चोरी केल्याचं यावरून समजतंय.” यासोबत त्यांनी त्यांच्या शॉपच्या फोडलेल्या भिंतीचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. या संदर्भात लीनवूड पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज मिळालं असून चोरांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
Here's the details of our break in from the other night. Pretty crazy stuff. Here's hoping Lynnwood police can find these crooks!
— Mike Atkinson (@coffeemikeatkin) April 4, 2023
Burglars steal $500K from Alderwood Mall Apple store after cutting hole in adjacent store https://t.co/lviHCT37HL
अॅपल प्रॉडक्स चोरीच्या घटना
अॅपल प्रोडक्सच्या चोरीची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी सुद्धा अनेकदा अॅपल प्रोडक्सची चोरी झालेली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये एका चोराने आयफोन विक्रेत्याला लुबाडत त्याने नुकताच खरेदी केलेले 125 आयफोन चोरले होते. या फोन्सची किंमत होती 95 हजार डॉलर.