Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15: नवीन आयफोन मालिका टायटॅनियम बॉडी आणि अधिक रॅमसह पॉवरफूल कॅमेरा आणि अनेक उत्कृष्ट फीचर्ससह

iPhone 15

iPhone 15 : आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक रॅम यासारख्या नवीन फीचर्सचा समावेश असेल.

आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक रॅम यासारख्या नवीन फीचर्सचा  समावेश असेल.

Apple या वर्षी आपली नवीन iPhone Series 15 सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लॉन्च केले जातील. हाँगकाँगच्या इन्व्हेस्टमेंट फर्म हैटॉन्ग इंटरनॅशनल सिक्युरिटीचे विश्लेषक जेफ पु यांनी आयफोनच्या नवीन सीरिजच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहिती दिली आहे. Jeff Pu च्या मते, बेस मॉडेल iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये 48-megapixel चा प्राइमरी रियर कॅमेरा सेन्सर पॅक करण्याची योजना आहे.

नवीन आयफोनला अधिक रॅम मिळेल

हे iPhones A16 बायोनिक चिपने सुसज्ज असतील. तसेच,  आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हॅप्टिक फीडबॅकसह सॉलिड स्टेट बटणे, टायटॅनियम फ्रेम डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक रॅम यासारख्या नवीन फीचर्सचा  समावेश असेल. प्रो व्हेरिएंट 8 GB पर्यंत रॅमने सुसज्ज असू शकतो.

iPhone 15 सिरीजचे  संभाव्य डिटेल्स 

MacRumors च्या रिपोर्टनुसार, iPhone 14 Pro मॉडेलमध्ये RAM 6 GB वरून 8 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. म्हणजेच आता नवीन आयफोन पूर्वीपेक्षा अधिक पॉवर पॅक्ड बनवला जाणार आहे. 9to5Mac च्या अहवालानुसार, iPhone 15 मॉडेल्सच्या कॅमेरा सेटअप आणि फीचर्सचा अंदाज लावला गेला आहे. आयफोन सीरीज 15 चे दोन नॉन-प्रो मॉडेल 48-मेगापिक्सेल वाइड लेन्ससह तीन-स्टॅक केलेल्या सेन्सरला सपोर्ट  देतील, असे सांगण्यात आले आहे.

हे सध्याच्या  iPhone 14 आणि iPhone 14 Plus चे अपग्रेड असेल कारण सध्या दोन्ही iPhones मध्ये 12-megapixel चा वाईड-एंगल कॅमेरा आणि 12-megapixel अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. दुसरीकडे, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मधील टेलीफोटो लेन्समध्ये ऑप्टिकल झूम आणखी वाढवता येऊ शकतो. प्रो मॉडेल नवीन A17 बायोनिक चिपच्या प्रोसेसिंग पॉवरने सुसज्ज असेल.

आयफोन 15 मालिकेची संभाव्य रचना

Macrumors च्या रिपोर्टनुसार, आयफोन 15 चे प्रो मॉडेल्स टायटॅनियम बॉडी डिझाइनमध्ये सादर केले जातील. फोनसोबत सॉलिड पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणासाठीही सपोर्ट असेल. प्रो आणि बेस मॉडेल्सना पूर्वीसारखाच स्क्रीन आकार मिळणार आहे.  

जेफ पु यांच्या मते, नवीन आयफोनच्या चार्जिंगमध्येही मोठा बदल दिसून येऊ शकतो. Apple जुन्या लाइटनिंग चार्जिंग पोर्टला USB Type-C पोर्टसह बदलू शकते, असे सांगण्यात  येत आहे. कंपनीने अद्याप iPhone 15 सीरीजबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.