Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Tips: नोकरदार महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

Investment

Image Source : https://www.freepik.com/

नोकरदार महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एफडीपासून सोन्यापर्यंत, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा निश्चितच फायदा होईल.

महिलांसाठी गुंतवणूक ही दीर्घकालीन उद्दिष्टे व आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. प्रामुख्याने नोकरदार महिलां जास्तात जास्त गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, गुंतवणुकीबाबत संपूर्ण माहिती नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. 

या लेखातून नोकरदार महिलांनी नक्की कुठे गुंतवणूक करावी व गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत जाणून घेऊयात.

नोकरदार महिलांसाठी गुंतवणुकीच्या टिप्स 

गुंतवणुकीची योजनागुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी याबाबत तुमच्याकडे ठोस योजना असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करत आहात, महिन्याला मिळणाऱ्या पगारातून किती पैशांची बचत करू शकता, तुमचा खर्च किती आहे, अशा विविध गोष्टींचा विचार करून गुंतवणुकीची योजना तयार करणे गरजेचे आहे. तुम्ही ठराविक उद्दिष्ट समोर ठेऊन गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
लवकर करा सुरुवातगुंतवणुकीचा फायदा मिळवायचा असल्यास लवकरात लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. समजा, नोकरी करणाऱ्या महिलेचे 25 ते 30 वर्ष असल्यास गुंतवणुकीला सुरुवात करणे फायद्याचे ठरते. कमीत वयात गुंतवणुकीला सुरुवात केल्याने भविष्यात त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे.
गुंतवणुकीत विविधतातुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे देखील अत्यंत गरजेचे आहे. यामुळे नुकसानीचा धोका कमी होता. तुम्ही सोने, स्टॉक्स, रिअल इस्टेट, एफडी, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. 
इमर्जन्सी फंडनफा कमवण्यासोबतच आपत्कालीन स्थितीमध्ये मदत होईल, हा गुंतवणुकीचा मूळ उद्देश असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे जवळपास 6 महिने खर्च भागवता येईल एवढी बचत असणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.

नोकरदार महिलांसाठी गुंतवणुकीचे पर्याय

ईपीएफनोकरदार महिलांसाठी ईपीएफ हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग आहे. ईपीएफमध्ये दरमहिन्याला पगारातील ठराविक रक्कम जमा होते. कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कमेसोबतच कंपनीकडून देखील तेवढीच रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. त्यामुळे नोकरदार महिलांना याचा दुहेरी फायदा होतो. याशिवाय, ईपीएफमध्ये जमा होणारी रक्कम वाढवता देखील येते. यामुळे या जमा झालेल्या रक्कमेचा भविष्यात फायदाच होतो.
सोनेमहिलांकडून सोन्याचे दागिने खरेदी करण्याला सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र, नोकरदार महिला याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही पाहू शकतात. केवळ सोन्याचे दागिनेच नाही तर डिजिटल सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे, सोन्याची नाणी यात देखील गुंतवणूक करू शकता. 
म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग आहे. नोकरदार महिला दरमहिन्याला पगारातील ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतात. ज्या महिलांना एकरकमी व मोठी गुंतवणूक करून जोखीम स्विकारायची नाही, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 
रिअल इस्टेट नोकरदार महिला अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, यासाठी तुम्हाला मोठी गुंतवणूक करावी लागेल. घर अथवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करून भाड्याने दिल्यास, यातून नियमित उत्पन्न सुरू होईल. तसेच, इतर गोष्टींच्या तुलनेत यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते.