आजच्या युगात मासिक ५० हजार ते १ लाख रुपये पगार असेल तरीही फारशी बचत करणे शक्य होत नाही. नोकरदार वर्गामध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांची मासिक बचत फक्त काही हजारांपर्यंत असू शकते. अशा परिस्थितीत, बरेच लोक ही बचत बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवणे पसंत करतात किंवा अशा कोणत्याही अन्य योजनेची निवड करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की अशा काही योजना आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बचतीच्या पैशावर अधिक फायदे मिळवू शकता, तेही अतिशय सुरक्षित मार्गाने. यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसची सुरक्षित व फायदेशीर ठेव बचत योजना (RD) निवडू शकता, जिथे बचत खात्याऐवजी गुंतवणुक करून त्या पैशांवर चांगला परतावा मिळू शकतो. विशेष बाब म्हणजे या योजनेत तुम्ही मासिक रक्कम 100 रुपये इतकी भरूनही गुंतवणूक करू शकता.
Table of contents [Show]
पोस्ट ऑफिस-बँक आरडी योजना (Post Office-Bank RD scheme)
स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम (RD) म्हणजेच या ठेवीबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर, अनेक बँका एफडीपेक्षा आरडीवर जास्त व्याज देत आहेत. काही नामांकित बँका 6 ते 7 टक्के इतका व्याजदर देत आहेत. तुम्ही बँकेत किमान ६ महिने आरडी खाते उघडू शकता. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमधील आरडी योजनेवर 5.8% (त्रैमासिक चक्रवाढ) दराने व्याज दिले जाते. तसेच, तुम्हाला किमान ५ वर्षांसाठी मुदत असलेली आरडी निवडणे आवश्यक आहे. तीन वर्षानंतर तुम्ही पैसे जमा करणे थांबवू शकता. एका वर्षानंतर, तुम्ही तुमच्या RD मध्ये जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
एफडी (FD) गुंतवणूकिचा सोपा पर्याय (Simple option of FD investment)
एफडी हा गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय आहे. अधिक व्याजदरामुळे येथे गुंतवणूक करणे तुलनेने फायदेशीर ठरते. परंतू एकाच वेळी तुम्हाला संपूर्ण रक्कम भरून दीर्घकाळासाठी ही ठेव जमा करावी लागेल. ज्यामध्ये तुम्हाला मासिक व्याज मिळेल. ही बचत खात्यावर दुप्पट व्याज मिळवण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.
आरडी'चे (RD) फायदे (RD benefits)
- आरडी ठेव गुंतवणूकदाराच्या बचतीवर अवलंबून असते आणि दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकतात.
- आरडीच्या लॉक-इन वैशिष्ट्यांतर्गत, व्याज दर सुरुवातीपासून शेवटपर्यंत समान राहतो आणि ठेवीवरील व्याजदर सुरूवातीलाच निश्चित केला जातो. म्हणजेच बाजारातील व्याजदर कमी असताना आरडीमध्ये फायदा होतो.
- आरडीमध्ये खाते उघडण्याच्या वेळी कालावधी निश्चित केला जातो. कालावधीच्या शेवटी, तुम्हाला व्याजासह संपूर्ण पेमेंट मिळते. आरडी 10 वर्षांपर्यंत असू शकते. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक योजना करता येते.
आरडीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी (How to start investing in RD)
पोस्ट ऑफिस, बँक येथे प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन भेट देऊन देखील आरडी खाते उघडता येते. तुम्ही मोबाईल अॅपद्वारे RD देखील उघडू शकता. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी उघडत असाल, तर तुम्ही रोख आणि चेकद्वारे पैसे जमा करून ते उघडू शकता. तुमचे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. दोन प्रौढांच्या नावानेही जॉइन्ट खाते उघडता येते.