Government Schemes for Widows : समाजातील विधवा, निराधार, परितक्त्या, देवदासी महिला आणि वृद्ध निराधार महिलांचे दैनंदिन जीवनमान सुसह्य व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. राज्यातील सर्व विधवा महिलांना विधवा पेन्शन योजनेतून आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो.यापैकी काही सरकारी योजना (Govt Schemes) स्वतंत्रपणे राज्य सरकारतर्फे राबविण्यात येतात तर काही योजना केंद्र सरकारतर्फे राबविल्या जातात.
गरजू महिलांना या सर्व योजनांची माहिती असायलाच हवी कारण यातून त्यांच्या उदरनिर्वाहास थोड्याफार नक्कीच मदत होऊ शकते. अशा काही निवडक योजनांची माहिती आपण घेऊ.
Table of contents [Show]
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (National Family Benefit Scheme)
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi National Widow Pension Scheme)
- संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana)
- आम आदमी विमा योजना (Aam Admi Bima Yojana)
- बायोमेट्रिक पद्धत (Biometric Method for Schemes)
- लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागद पत्रे (Important Documents for Schemes)
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (National Family Benefit Scheme)
दारिद्रय रेषेखलील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील घरातील कर्ता कमावणारा आर्थिक सहाय्यक व्यक्तीचा (पुरुष अथवा स्त्री) चा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियास एक रकमी 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. मृत्युच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्जासोबत दारिद्रय रेषेखालील यादीत नाव समाविष्ट असल्याचा पुरावा व मृत्युचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi National Widow Pension Scheme)
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नांव असलेल्या 40 ते 65 वर्षापेक्षा कमी वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. त्यांना या योजनेमधून प्रतीमाह 200 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून प्रतीमाह 400 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते.
संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana)
या योजने अंतर्गत 600 रुपये दरमहा इतके अनुदान दिले जाते आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबास दरमहा 900 रुपये मिळतात. लाभार्थींना तिच्या अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत, किंवा ती नोकरी करेपर्यंत, हा लाभ दिला जाईल. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपयांपर्यंत आहे आणि त्या महिलेचे किंवा व्यक्तीचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, अत्याचारित महिला, तृतीयपंथी, अनाथ बालके, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी, 35 वर्षे व त्यावरील निराधार अविवाहीत महिला अर्ज करु शकतात. सदरील अर्ज संबधित तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये भरुन सादर करावा. विधवा महिलेस फक्त मुलीस असल्यास, मुलीचे वय 25 वर्षे झाले वा त्या लग्न होऊन नांदावयास गेल्या तरी सुध्दा लाभ चालू ठेवण्यात येईल.
आम आदमी विमा योजना (Aam Admi Bima Yojana)
लाथार्थ्याचा नैसर्गिक मृत्यु झाल्यास त्याच्या वारसाला 30 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थ्यांना वारसांना, लाभार्थ्यांस रक्कम देण्यात येते. अपघाती मृत्यु झाल्यास 75 हजार रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये, अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास 75 हजार रुपये आणि अपघातामुळे एक डोळा व एक पाय गमावल्यास 37 हजार 500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना 100 रुपये प्रतीमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील ज्याच्याकडे शेतजमीन नाही, अशा शेतमजुरांना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.
वार्षिक विम्याचा हप्ता प्रती लाभार्थी 200 रुपये इतका असून केंद्र सरकारमार्फत 100 रुपये व राज्य सरकारमार्फत 100 रुपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो. त्याचप्रमाणे लाभार्थ्याच्या नववी ते बारावी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना 100 रुपये प्रतीमाह शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या व्यक्तीकडे 2.5 एकर बागायती किंवा 5 एकर कोरडवाहू जमीन असेल अशा व्यक्तीला या योजनेअंतर्गत भूमीहीन समजण्यात येते.
बायोमेट्रिक पद्धत (Biometric Method for Schemes)
आज काल राज्य सरकारमार्फत नवीन बायोमेट्रिक पद्धत अवलंबली जात आहे त्या द्वारे बँकेच्या प्रतिनिधीजवळ असलेल्या बायोमेट्रिक यंत्रावर लाभार्थ्यांना त्यांच्या बोटाचे ठसे उमटविल्यानंतर यंत्राद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटविली जाते व पात्र व नोंदणीकृत लाभार्थ्यांला त्याचे अनुदान दिले जाते. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कमही त्यांना कळविली जाते.
लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागद पत्रे (Important Documents for Schemes)
- आधारकार्ड किंवा अर्जासोबत वयाचा दाखला
- 21 हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- बँकेचे पास बुक