इंडिगो एअरलाईन्सची ऑपरेटिंग कंपनी इंटरग्लोब एव्हीएशन (Interglobe Aviation) च्या अहवालानुसार दिला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेने 129.8 कोटी रुपये वाढून 1422.6 कोटी रुपये झाला. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत कंपनीला अनुक्रमे 1064 आणि 1583कोटींचा तोटा झाला होता.मात्र यात सुधारणा झाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 15,410 कोटी रुपये इतके झाले तसेच मागील वर्षी याकाळात कंपनीने 9,480 कोटी रुपये इतक्या एकूण उत्पन्नाची नोंद केली होती.
इंडिगो एअरलाईन्सने एका तिमाहीत कमवलेले हे सर्वाधिक उत्पन्न
इंडिगो एअरलाईन्सचे सीईओ पीटर एल्बर्स म्हणाले की, कंपनीने एका तिमाहीत नोंदवलेले हेआतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न आणि नफा आहे. पुढे पीटर अल्बर्स म्हणाले, "तिसऱ्या तिमाहीत आमची व्यावसायिक आणि आर्थिक कामगिरी जोरदार हवाई प्रवासाच्या मागणीमुळे शक्य झाली आहे.या व्यतिरिक्त, आम्ही कमाई वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण पावले देखील उचलली, याचे फळ कंपनीला मिळाले आहे."
एव्हीएशन क्षेत्रातील आव्हानांसाठी कंपनी सज्ज
इंडिगो एअरलाईन्सकडे 300 विमानांचा ताफा आहे.या विमानांच्या मदतीने इंडिगो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे.यामुळे एव्हीएशन क्षेत्रातील प्रत्येक आव्हान स्वीकारायला इंडिगो तयार आहे. इंटरग्लोबल एव्हिएशनचे शेअर्स आज बीएसईवर 1.21%घसरून 2,100 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 5.02% वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याची किंमत सुमारे 6.37% वाढली आहे.