अक्षता मूर्ती हे नाव आता अनेकांना परिचित झाले असेल. इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची एकुलती एक कन्या तसेच ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची पत्नी म्हणून त्या संपूर्ण जगाला आता अपरिचित आहेत.
सध्या अक्षता मूर्ती या चर्चेत आहेत ते एका नव्या प्रकरणामुळे. अक्षता मूर्ती यांनी अलीकडेच लाभांशाच्या आधारे जवळपास 138 कोटी रुपये कमावले आहेत.होय तब्बल 138 कोटी! इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत अक्षता यांचे केवळ 1.05% हिस्सेदारी आहे. इन्फोसिसने अलीकडेच आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळी, कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 18 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. अक्षता यांच्याकडे असलेल्या शेअरच्या आधारे त्यांना 138 कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला आहे.
#Infosys announces interim dividend of Rs 18 per share —
— The Trading Marvel ®️ (@TradingMarvel) October 12, 2023
The record date for the said interim dividend has been fixed on October 25, 2023.
Infosys has also fixed November 6, 2023 as the payout date.
अक्षता मूर्तींचे शेअर्स किती?
आता तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की Infosys मध्ये केवळ 1.05% हिस्सेदारी असलेल्या अक्षता मूर्ती यांच्याकडे एकूण किती शेअर्स असतील? तर उपलब्ध माहितीनुसार अक्षता यांच्याकडे एकूण 3,89,57,096 शेअर्स आहेत. इन्फोसिसने त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 18 रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्षता यांना 138 कोटी रुपयांचा लाभांश प्राप्त झाला आहे.
ब्रिटनमध्ये अक्षता मूर्तींची चर्चा
मागील वर्षी ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे प्रधानमंत्री बनले. प्रधानमंत्र्यांची पत्नी म्हणून अक्षता मूर्ती या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेताना दिसतात. संपत्तीच्या बाबतीत अक्षता या ब्रिटनमध्ये आणि भारतात कायम चर्चेत असतात.
अक्षता यांची संपत्तीचा जर विचार कला तर त्यातील बहुतांश भाग हा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आयटी कंपनी, इन्फोसिस कडून येते.त्यांच्या संपत्तीचे मूल्य सुमारे 73 अब्ज डॉलर इतके आहे.