Unemployment Rate India: भारताच्या विकासाचे इंजिन जरी वेगाने धावत असले तरी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाण पुरेसे नाही. दरवर्षी महाविद्यालयातून पदवी घेऊन लाखो युवक युवती बाहेर पडतात. मात्र, त्यातील फक्त काही जणांच्याच वाट्याला नोकरी किंवा रोजगार येतोय. सध्या तर अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरकपातही करत आहेत. बेरोजगारीची पुढे आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी असून जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला आहे.
देशात 3 कोटी 33 लाख बेरोजगार (Unemployed people in India)
फेब्रुवारी 2023 मध्ये बेरोजगारीचा दर 7.45% झाला असून जानेवारी महिन्यात हा दर 7.14% इतका होता. देशात बेरोजगार व्यक्तींची संख्या 3 कोटी 33 लाख इतकी वाढली आहे. जानेवारी महिन्यात बेरोजगारांची संख्या 3 कोटी 15 लाख इतकी होती. एकाच महिन्यात आकडेवारीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढली (Rural unemployment rate)
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारी संबंधी अहवाल जाहीर केला आहे. (Unemployment Rate India) यामधून ग्रामीण भागाबद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे. 2022 मधील शेवटचे चार महिने ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर कमी होत होता. मात्र, जानेवारीपासून पुन्हा ग्रामीण भागातील बेरोजगारी दरात अचानक वाढ झाली.
ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर जानेवारी महिन्यात 6.48% इतका होता. (unemployment rate ) त्यात वाढ होऊन 7.23% इतका झाला आहे. या दोन महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारांच्या संख्येत 23 लाखांची भर पडली आहे. कोरोनानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारत होती. रोजगाराच्या संधीही निर्माण होत होत्या. मात्र, ही परिस्थिती पुन्हा बदलली आहे. याउलट, शहरी बेरोजगारीचा दर जानेवारीतील 8.55% वरून फेब्रुवारीमध्ये 7.93% इतका घसरला. त्यामुळे 73 लाख शहरी व्यक्तींना रोजगार मिळाल्याने एकूण बेरोजगारांची संख्या 11 कोटी 30 लाख इतकी आहे.