Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Good Financial Behaviour: भारताची डिजिटल फायनान्सच्या दृष्टीने लक्षवेधी झेप; गावागावांत डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर

Prudent Use of Digital Financial Services

Good Financial Behaviour: डिजिटल फायनान्सला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाला आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यापासून बॅंकांचे मोठमोठे व्यवहार डिजिटल फायनान्समुळे चुटकीसरशी होऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या डिजिटल फायनान्स हा परवलीचा शब्द बनला आहे.

Good Financial Behaviour: खिशात रोख रक्कम नसतानाही संपूर्ण भारत फिरण्याची ताकद आज लोकांना डिजिटल फायनान्समुळे मिळत आहे. घर विकत घ्यायचे आहे; कोणाला टोकन किंवा ॲडव्हान्स द्यायचा आहे; किंवा डाऊन पेमेंट करायचे आहे; किंवा खिशात एक दमडीही नसताना एखादी वस्तू थेट विकत घेण्याची ताकद आज आपल्याला डिजिटल फायनान्सने (Digitial Finance) दिली आहे आणि आपल्या डिजिटल इंडियाची हेच यश आहे, असे मानले तर चुकीचे ठरणार नाही. कारण भारतात ज्या पद्धतीने डिजिटल फायनान्शिअल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. त्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे.

भारतातील शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत, शिक्षित वर्गापासून अशिक्षतांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना स्मार्टफोन या तंत्रज्ञानाने बहुतांश लोकांना डिजिटली शिक्षित करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. कारण स्मार्टफोन ही अशी वस्तू ठरली आहे. जी सध्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टींमध्ये स्मार्टफोनचा समावेश झाला आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा इतक्या सर्रासपणे वापर प्रत्येक जण करू लागला आहे. हेच डिजिटल इंडियाच्या यशाचे गमक मानले जात आहे.

डिजिटल फायनान्सचे फायदे तसे धोकेही

डिजिटल फायनान्सच्या सोयीमुळे लोकांची जशी सोय झाली आहे. तसे लोकांना फसवण्याचे प्रमाण ही वाढले आहे. सुशिक्षित लोकांबरोबरच, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांची डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. हे सर्व तंत्रज्ञान इंटरनेट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवलंबून असल्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेणे काळजी गरजेचे आहे. डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोतच. त्यापूर्वी आर्थिक साक्षरता का गरजेचे आहे. हे आपण समजून घेऊ.

Digital finance for all entities

आर्थिक साक्षरता म्हणजे काय?

आर्थिक साक्षरता (Financial Literacy) ही बजेट म्हणजे काय इथपासून सुरू होते. त्यात गुंतवणूक कशी करायची? पैशांचा जमा-खर्च का आणि कसा मांडायचा?, गुंतवलेल्या पैशांमध्ये वाढ होण्याची योग्य पर्याय कोणते? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पैशांवरून कोणी आपली फसवणूक केली जाऊ नये. यासाठी ज्या गोष्टींची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. त्याला आर्थिक साक्षरता म्हटले जाते. आर्थिक साक्षरतेचे पुढचे पाऊल हे डिजिटल साक्षरता आहे.

आर्थिक डिजिटल साक्षरता म्हणजे काय?

आर्थिक डिजिटल साक्षरता (Financial Digital Literacy) म्हणजे साध्या शब्दात सांगायचे झाले तर, तुमच्या स्मार्टफोनवरून पैसे पाठवण्यासाठी तुम्ही जे अॅप वापरता. त्याचे फायदे-तोटे आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. यालाच डिजिटल साक्षरता म्हटले जाते. डिजिटल या शब्दाला इंटरनेटची संगत असल्यामुळे इंटरनेटद्वारे तुम्ही जे काही व्यवहार करता. ते डिजिटल फायनान्समध्ये येतात आणि ते कसे वापरले पाहिजे. त्याची सुरक्षितता कशी घेतली पाहिजे, याबाबतची माहिती असणे म्हणजे डिजिटल साक्षर असणे.

भारतात डिजिटल पेमेंटचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

  • युपीआय (Unified Payments Interface)
  • भीम (Bharat Interface for Money)
  • युपीआय 123 पे (UPI 123 PAY)
  • युपीआय लाईट (UPI Lite)
  • पेमेंट कार्ड्स - डेबिट-क्रेडिट कार्ड (Payment Cards - Debit, Credit Card
  • आयएमपीएस (Immediate Payment Services-IMPS)
  • आरटीजीएस (Real Time Gross Settlement-RTGS)
  • एनईएफटी (National Electronic Funds Transfer-NEFT)
  • ई-रुपी (e-RUPI)
  • भारत बिल पेमेंट सिस्टम (Bharat Bill Payment System-BBPS)


आरबीआयकडून तत्त्वत: परवानगी मिळालेले पमेंट ॲग्रीगेटर्स

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया(RBI)ने सध्या मार्केटमध्ये सुरू असलेल्या 32 पेमेंट ॲग्रीगेटर्सन ऑनलाईन पेमेंट ॲग्रीगेटर्स म्हणून सेवा देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामध्ये गुगल इंडिया डिजिटल, ॲमेझॉन पे इंडिया, रिलायन्स पेमेंट सोल्युशन, झोमॅटो पेमेंट्स आदी पेमेंट ॲग्रीगेटर्सचा समावेश आहे. तसेच आरबीआयने आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी खाली दिलेल्या यादीतील प्रमाणित पेमेंट अॅग्रीगेटर्ससोबतच व्यवहार करावा, असे आवाहन केले आहे.

डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण घेऊन ऑनलाईन फसवणूक टाळता येऊ शकते. त्यासाठीचे अनेक उपाय उपलब्ध आहेत. जसेच की, सर्वप्रथम कोणत्याही बेकायदेशीर वेबसाईटवरून व्यवहार करू नका. स्वत:च्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरूनच आर्थिक व्यवहार करा. आर्थिक व्यवहारांसाठी फ्री-इंटरनेटचा वापर शक्यतो टाळा, अशा बेसिक गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षित आर्थिक व्यवहार करू शकता.

Financial Literacy Week 2023 MahaMoney.com