Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

आता साध्या फोनवरूनही करता येणार डिजिटल पेमेंट!

UPI123Pay च्या मदतीने पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते लिंक करून फीचर फोनवरून ही करता येणार डिजिटल पेमेंट.

भारतातील 40 कोटीपेक्षा अधिक लोक अजूनही साधा फोन (फीचर फोन) वापरतात. असा फोन वापरणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)ने आनंदाची बातमी आणली आहे. आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी स्मार्ट फोन आणि इंटरनेटची गरज भासणार नाही. साध्या फीचर फोनवरूनही डिजिटल पेमेंट करता येणार आहे. RBIने नुकतीच फीचर फोनसाठी UPI आधारित पेमेंट सर्व्हिस सुरू केली. या सर्व्हिसच्या मदतीने फीचर फोन वापरणाऱ्यांनाही आता सहजपणे डिजिटल पेमेंट करता येणार आहे. 

साधे फोन स्मार्ट फोनच्या तुलनेत बरेच स्वस्त असतात. त्यावर मुख्यत: कॉल आणि मेसेजेस या दोन सुविधा असतात. खेडेगावाप्रमाणेच शहरातील ही बरेच लोक फीचर फोन वापरतात. तसेच गावात इंटरनेटची सोय सुद्धा सतत उपलब्ध नसते. यावर उपाय म्हणून RBI आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने फीचर फोनसाठी UPI123Pay डिजिटल पेमेंट सेवा सुरू केली आहे. या नवीन प्रणालीद्वारे साध्या फोनवरून एका व्यवहारासाठी 5 हजार रूपयापर्यंत तर संपूर्ण दिवसात 1 लाख रूपयांपर्यंत डिजिटल पेमेंट करता येणार आहे. 

UPI123Pay डिजिटल पेमेंटची वैशिष्ट्ये 

• UPI123Pay हे मराठीसह इतर बऱ्याच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ते वापरायला आणि समजायला खूपच सोपे आहे. 

• फक्त 3 टप्प्यांमध्ये पेमेंट करता येते. 

• UPI123Pay चा वापर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता नाही.

• साध्या फोन किंवा फिचर फोन वरून व्यवहार करता येणार म्हणजेच स्मार्ट फोन असण्याची आवश्यकता नाही. 

• पैसे पाठवण्याबरोबरच इतर अनेक गोष्टींचा वापर करता येणार. जसे की, UPI Pin सेटअप करणे किंवा बदलणे. UPI शी संलग्न असणारे खाते बदलणे. UPI व्यवहारांची माहिती घेणे. UPI संबंधित तक्रारींची नोंद करणे. खात्याचा Balance check करणे. Fastag recharge, EMI Payment , Mobile recharge इत्यादी. 

UPI123Pay चा वापर करण्यासाठी आवश्यक गोष्टी 

  • UPI संलग्न कोणत्याही एका बॅंकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • बॅंक खात्याला मोबाईल क्रमांक लिंक असावा. 
  • बॅंकेचे डेबिट कार्ड असावे. 


UPI123Pay द्वारे 4 प्रकारे पैसे पाठवता येतात 

1. IVR (Interactive Voice Response) द्वारे 08045163581 / 08045163636 वर फोन करून 

2. विशिष्ट क्रमांकावर मिस्ट कॉल देऊन 

3. RBI च्या फीचर फोनवरील app द्वारे 

4. Voice / Sound द्वारे 

IVR (Interactive Voice Response) द्वारे पेमेंट 

  • सर्वप्रथम आपल्याला 08045163581 किंवा 08045163636 या मोबाईल क्रमांकावर कॉल करावा लागेल 
  • त्यानंतर आपल्याला एक पर्याय निवडावा लागेल. जसे की, पैसे पाठवण्यासाठी 1, आणि Balance Inquiry साठी 2 क्रमांक दाबा. 
  • पैसे पाठवण्यासाठी 1 पर्याय निवडल्यानंतर Account Setup करावे लागेल. 
  • त्यासाठी आपले ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे नाव आपल्याला सांगावे लागेल. त्यानंतर बॅंकेच्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक टाकून UPI Pin तयार करावा लागेल.
  • जर तुमचे UPI Account आधीपासून अस्तित्वात असेल. जसे की, BHIM UPI, Phone pay, Google Pay तर तुम्हाला पुन्हा Account Setup करण्याची गरज नाही.
  • UPI Pin तयाल केल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांकाद्वारे किंवा बॅंक खाते क्रमांकाद्वारे पैसे पाठवण्याचा पर्याय निवडू शकता. 
  • मोबाईल क्रमांक वापरून पैसे पाठवणार असाल तर ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा UPI संलग्न मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. 
  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर UPI Pay टाकावा लागेल. 
  • UPI Pay टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश मोबाईल क्रमांकावर येईल.

विशिष्ट क्रमांकावर मिस्ट कॉलद्वारे पेमेंट 

  • दुकानदाराने दर्शविलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. हा क्रमांक दुकानदाराचा UPI मधला ID असेल. 
  • मिस्ड कॉल दिल्यानंतर पेमेंट प्रमाणित करण्यासाठी 08071 800 800 या क्रमांकवरून फोन येईल. 
  • आलेला फोन स्वीकारून तुम्हाला पाठवायची रक्कम आणि तुमचा UPI Pin टाकून पेमेंट करा. 

RBIच्या फीचर फोनवरील app द्वारे पेमेंट 

  • फिचर फोन मध्ये एक Digital Solution नावाचे अँप असेल ज्या अँपद्वारे UPI123Pay चा वापर करता येईल. 
  • या अँपवरून पैसे पाठवणे, Mobile recharge, Balance check, Fastag recharge इत्यादी कामे करता येतील. फक्त Scan & pay या सुविधेचा वापर करता येणार नाही. 
  • फिचर फोन मधील UPI अँप Open करा आणि त्यात मोबाईल क्रमांक टाका. 
  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर बँकांची यादी येईल. त्यातून तुमच्या बँकेची आणि बँक खात्याची निवड करा. 
  • बॅंक निवडल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचा UPI ID तयार होईल. 
  • UPI ID तयार झाल्यानंतर UPI Pin तयार करावा लागेल. Pin तयार झाला की, UPI123Pay चा वापर करून पैसे पाठवण्याबरोबरच इतर सेवांचा लाभ घेता येईल.

वॉईस/साऊंडद्वारे (Voice / Sound) पेमेंट 

  • या पद्धतीमध्ये एका विशिष्ट उपकरणाजवळ तुमचा फोन नेऊन UPI Pin क्रमांक दाबून पेमेंट करता येईल. 

24 तास हेल्पलाईन सेवा

UPI123Pay सेवेचा लाभ घेताना काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी Digisathi.com या वेबसाईटवरून आणि 14431 व 1800 891 3333 या क्रमांकावरून मदत घेता येईल. ही सेवा दिवसाचे 7 दिवस 24 तास सुरू असणार आहे.