Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IIF: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 2024 मध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत पोहचणार

IIF Report 2022

Image Source : www.india.postsen.com

India News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.

India News: IMF ने नुकताच भारतासाठीचा 'Annual Consultation Report' जारी केला, त्यावेळी ते म्हणाले की, "आम्ही पाहतोय की चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था खूप मजबूत होत आहे." या जारी केलेल्या अहवालानुसार, कमी अनुकूल दृष्टीकोन (Less Favorable Scenario) आणि कठीण आर्थिक परिस्थिती पाहता विकास दर मध्यम राहण्याचा अंदाज आहे. भारतावरील IMF अहवालानुसार 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये वास्तविक जीडीपी(GDP) 6.8 टक्के आणि 6.1 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. हे अंदाज पूर्वीपेक्षाही खूपच चांगले असल्याचे चौएरी नाडा यांनी म्हटले आहे. "आमच्या अंदाजानुसार, भारत यावर्षी आणि पुढील वर्षी जागतिक विकासात अर्धा टक्का योगदान देईल."

जगभरातील कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, बाहेरील देशांकडून घटलेली मागणी आणि कठीण आर्थिक परिस्थितीमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.1 टक्के राहणार आहे असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 
(International Monetary Fund) प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षासाठी 6.8 टक्क्यांपेक्षा पुढील वर्षात वाढीचा दर 6.1 टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे आयएमएफच्या (IMF) अहवालात म्हटले आहे. आर्थिक वाढीवर कोरोनाचा पुन्हा वाढत असलेल्या प्रादुर्भावाचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या अहवालातून दिला आहे.

चालू आर्थिक वर्ष आणि पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर अनुक्रमे 6.8 टक्के आणि 6.1 टक्के राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने  वर्तवला आहे. यासोबतच भारतासमोर खूप कठीण आव्हाने आहेत आणि जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत हा प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतोय, असं IMF च्या भारतीय मिशनचे प्रमुख चौएरी नाडा  (Choueiri Nada) यांनी म्हटले आहे.

महागाई कमी होणार?

आयएमएफच्या अहवालात महागाईसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतातील महागाई हळूहळू कमी होऊन 2022-23 मध्ये महागाई 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे. पुढील वर्षीपासून महागाईत घसरण होत असल्याचे दिसून येईल व त्यानंतर 5 वर्षांत ती 4 टक्क्यांपर्यंत खाली येईल. RBI च्या समाधानकारक श्रेणीत  2 वर्षांतच महागाई कमी होईल. नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे.  2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.

वाढती आयात मागणी आणि वस्तूंच्या किमतींमुळे भारताची चालू खात्यातील तूट FY23 मध्ये GDP च्या 3.5 टक्क्यांपर्यंत वाढेल असं IMF अहवालात म्हटलं आहे.  IMF च्या मते, जरी क्रेडिट ग्रोथ सुधारत असली तरी मध्यम कालावधीत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ती अधिक मजबूत करणं गरजेचं आहे.