Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go Digital! प्रिंट, टीव्हीला उतरती कळा, डिजिटल जाहिराती 'नंबर वन'

India’s Advertising Revenue

India’s Advertising Revenue: मागील काही वर्षात या जाहिरात क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे. 2022 वर्षाअखेरीस जाहिरात क्षेत्राने कमावलेला महसूल 14.9 अब्ज डॉलर एवढा असेल असा अंदाज मीडिया क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या ग्रुपएम या कंपनीने वर्तवला आहे. एकूण जाहिरातीमधील डिजिटल जाहिरातींचा वाटा 48.8% असेल असा अंदाजही कंपनीने आपल्या अहवालात वर्तवला आहे.

जाहिरात हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. बऱ्याच वेळा तर सर्वोत्तम जाहिराती इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. टीव्ही, इंटरनेट, फुटपाथ, एक्झिबिशन सेंटर्स एवढंच काय तर घरांच्या भिंतीही जाहिरातींनी व्यापलेल्या असतात. मागील काही वर्षात या जाहिरात क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे. 2022 वर्षाअखेरीस जाहिरात क्षेत्राने कमावलेला महसूल 14.9 अब्ज डॉलर एवढा असेल असा अंदाज मीडिया क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या ग्रुपएम या कंपनीने वर्तवला आहे. एकूण जाहिरातीमधील डिजिटल जाहिरातींचा वाटा 48.8% असेल असा अंदाजही कंपनीने आपल्या अहवालात वर्तवला आहे. त्यामुळे छापील माध्यमातून जसे की, न्यूज पेपर, मासिक, आऊट डोअर माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण खालावले आहे.

डिजिटल जाहिराती का वाढतायेत? (Growth in digital adds)

भारतामध्ये मागील काही वर्षात इंटरनेट क्रांती झाली असून डिजिटल क्षेत्राने शहरीच नाही तर ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. विशेषत: रिलायन्स जिओने इंटरनेट डेटा जास्त देण्यास सुरुवात केल्यानंतर स्मार्ट फोन वापरकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. सेवा आणि निर्मिती क्षेत्रातील प्रत्येक कंपनी डिजिटल फूटप्रिंट वाढवत आहे. डिजिटल जाहिरातीद्वारे ग्राहकाशी थेट संवादही साधता येतो आणि उत्पादन सेवा विकणेही सोपे होते. किती लोकांपर्यंत आपण पोहचलो हे समजणे शक्य आहे. टीव्ही, प्रिंट, पोस्टर किंवा इतर माध्यमातील जाहिरातीमुळे ते शक्य नाही. परिणामी डिजिटल जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक इंटरनेटवर असल्याने कंपन्याही इंटरनेटच्याच मागे धावत आहेत.  

जाहिरात क्षेत्राची वार्षिक वाढ 15.8%

भारतामध्ये जाहिरात क्षेत्र दरवर्षी 15.8% या वेगाने वृद्धी करत आहे. तर 2023 वर्षात जाहिरात क्षेत्रातील महसूल मागील वर्षापेक्षा 16.8% इतका वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. रिटेल मीडिया जाहिरात क्षेत्र डिसेंबर अखेर 55 कोटी डॉलरपर्यंत पोहचेल तसेच 2027 पर्यंत दुप्पट विकास नोंदवेल, असेही कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

टीव्हीवरील जाहिरातींचा वाटा 36% (TV ads in India)

एकूण जाहिरातींतील टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातीचा वाटा 36% आहे. 2022 वर्षाअखेर यात आणखी 10% वाढ होणार असल्याचे कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. चालू वर्षात टीव्ही आणि डिजिटल जाहिरातींमध्ये प्रामुख्याने वाढ झाली. 2023 वर्षात टीव्ही जाहिरातींत 13.8% वाढ होईल. चालू वर्ष 2022 मध्ये डिजिटल जाहिरातींमध्ये 17.3% वाढ झाली होती ती वाढून 2023 मध्ये 21% पर्यंत जाईल असे कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे.   बाकी देशांच्या तुलनेत भारतामध्ये जाहिरात क्षेत्राची वाढ जास्त होणार असल्याचा अंदाज अहवालात नोंदवला आहे. जागतिक स्तरावर चालू वर्षात जाहिरात क्षेत्राची वाढ 6.5% झाली. 2023 वर्षात त्यात घट होऊन 5.9% होईल, असे अहवालात म्हटले आहे. 

डिजिटल जाहिरातींची जागतिक स्तरावर वाढ

चालू वर्षात जागतिक स्तरावर डिजिटल जाहिरातींचे प्रमाण 9.3% वाढेल. 2021 साली जागतिक स्तरावर डिजिटल जाहिरातीत 31.9% दराने वाढ झाली होती. फक्त गुगल आणि फेसबुक या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त इतरही क्रिएटीव्ह आणि नव्या पर्यायांचा जाहिरात करण्यासाठी कंपन्या विचार करत असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. रिटेल उद्यागातील कंपन्यांच्या जाहिरातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना आणि त्यानंतर लागू झालेल्या अनेक लॉकडाऊनमुळे आऊट डोअर जाहिरातींचे प्रमाण कमी झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. प्रिंट माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण या वर्षीअखेरीस 7.4% खाली येईल तसेच 2027 पर्यंत या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याची चिन्ह दिसत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.