Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MPL 2023: IPL आणि MPL यांच्यातील फरक काय?

Crickets

Maharashtra Premier League - MPL: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलच्या (Indian Premier league-IPL) मॅचेस संपल्या. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट प्रेमींसाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 (Maharashtra Premier League - 2023) आणली आहे. येत्या 15 जूनपासून पुण्यातील गाहुंजे स्टेडीअम येथे MPL ला सुरुवात होणार आहे.

Indian Premier league (IPL): मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलची (Indian Premier league-IPL)धामधूम संपली. यात चेन्नई सुपरकिंग्ज संघ 20 कोटींचे घसघशीत बक्षिस घेऊन विजयी ठरला. IPL च्याच धर्तीवर आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने क्रिकेट प्रेमींसाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 (Maharashtra Premier League-2023) आणली आहे. येत्या 15 जूनपासून पुण्यातील गाहुंजे स्टेडीयम येथे MPL ला सुरुवात होणार आहे. आज आपण आयपीएल आणि एमपीएल यांच्यातील फरक जाणून घेणार आहोत. (Difference between IPL & MPL)

आयपीएल (Indian Premier League-IPL)

आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, ही पुरुषांची ट्वेंटी20 (T20) क्रिकेट लीग आहे, जी भारतात दरवर्षी आयोजित केली जाते. या लीगमध्ये विविध देशातील संघाचे खेळाडू खेळतात. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल लीगची स्थापना केली होती. या स्पर्धेचे आयोजन प्रत्येक वर्षी मार्च ते मे महिन्या दरम्यान आयोजित केले जाते. 2022 मध्ये IPL ची ब्रँड व्हॅल्यू 90,038 कोटी रुपये होती. तर BCCI च्या मते 2015 च्या आयपीएलच्या मॅचने भारताच्या जीडीपीमध्ये 1,150 कोटी रुपयांचे योगदान दिले. आयपीएलमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला. तसेच इतर देशांतील लोक हा खेळ पाहण्यासाठी भारतात येत आहेत. त्यामुळे देशाच्या पर्यटनातही वाढ होत आहे.

एमपीएल (Maharashtra Premier League-MPL)

आयपीएलच्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रीमिअर लीग (Maharashtra Premier League-MPL) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार आहेत. तसेच, सदैव राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले आहे. पुण्यात पार पडणाऱ्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये छत्रपती संभाजी किंग्स (CSK) संघाचे मालक आमदार धनंजय मुंडे आहेत.  15 ते 29 जून दरम्यान पुण्यातील गाहुंजे स्टेडीयमवर MPL ला चा सामना रंगणार आहे.

कसे पाहता येणार सामने

महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये विजयी ठरणाऱ्या टीमला पहिल्या क्रमांकाचे बक्षिस म्हणून 50 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. तर रनर-अप टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे सामने डीडी स्पोर्ट्स (DD Sports) या चॅनेलवरून पाहता येणार आहे.

कोण आहेत आयकॉन खेळाडू?

महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 मध्ये पुणेरी बाप्पा संघाचा ऋतुराज गायकवाड, ईगल नाशिक टायटन्सचा राहुला त्रिपाठी, कोल्हापूर टस्कर्सचा केदार जाधव, छत्रपति संभाजी किंग्जचा राजवर्धन हांगरगेकर, रत्नागिरी जेट्सचा अजिम काझी, सोलापूर रॉयल्सचा विकी ओसवाल हे आयकॉन खेळाडू आहेत.

नौशाद शेख सर्वात महागडा खेळाडू

महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 साठी झालेल्या लिलावात नौशाद शेख हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशाद साठी सगळ्यात जास्त अशी सहा लाख रुपयांची महागडी बोली लावली. एमपीएलच्या शिखर समितीने यावेळी संघांची नावे देखील निश्चित केली. पुणे संघ हा पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल, पुनीत बालन समुहाचा संघ -कोल्हापूर टस्कर्स, इगल इन्फ्रा इंडीयाचा संघ -ईगल नाशिक टायटन्स, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजचा संघ -छत्रपति संभाजी किंग्ज, जेट्स सिंथेसिसचा संघ- रत्नागिरी जेट्स, कपिल सन्सचा संघ- सोलापूर रॉयल्स अशा नावांनी ओळखल्या जाणार आहे.

एमसीए महिलांचे सामनेदेखील भरवणार

महाराष्ट्र प्रीमिअर लीग सुरु करण्यामागे महाराष्ट्रातील खेळाडुंना आयपीएलमध्ये जाण्यास वाव मिळावा. खेळाडुंच्या क्षमतांना आणि कौशल्यांना एक व्यासपीठ मिळावे, हा उद्देश होता. महत्वाचे म्हणजे या खेळाची घोषणा करताच आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला. सहा टीम मिळून तीन वर्षामध्ये महाराष्ट्राला 58 कोटींच्या जवळपास निधी मिळाला आहे. हा निधी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये क्रिकेटला पुढे नेण्यास ज्या सोई-सुविधा करायच्या असतील, त्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच, या वर्षी या एमपीएलमध्ये महिलांच्या तीन टीम मॅच खेळणार आहेत. तर पुढल्या वर्षी मुलींच्या चार टीम ऑक्शन मध्ये काढणार आहोत. महाराष्ट्रातील ज्या मुलींमध्ये क्रिकेट खेळण्याचे कौशल्य आहे त्यांनी पुढे यावे, असे आवाहन एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले.