Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Energy Week: देशात E-20 पेट्रोलचे पदार्पण, अर्थव्यवस्थेला होणार मोठा फायदा

E20 Fuel

Image Source : www.pib.gov.in

E-20 Fuel: हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत अनेक प्रयोग करत आहे. याचाच एक भाग म्हणून E-20 पेट्रोलची निर्मिती भारतात सुरु झाली आहे. इंधनदरवाढीचा आणि प्रदूषणाचा त्रास यामुळे कमी होणार आहे. जाणून घ्या काय आहे E-20 पेट्रोल.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे कालपासून भारत ऊर्जा सप्ताह (India Energy Week 2023) सुरू झाला आहे. ऊर्जा संक्रमणाचे केंद्र म्हणून भारताची वाढती शक्ती प्रदर्शित करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात जगभरातून वेगवेगळ्या देशांचे 30 हून अधिक मंत्री, 3000 हून अधिक प्रतिनिधी, 1000 हून अधिक प्रदर्शक आणि सुमारे 500 वक्ते सहभागी झाले आहेत. प्रधानमंत्री मोदींनी जगभरातील तेल आणि कंपन्यांच्या सीईओंसोबत गोलमेज परिषदेत संवादही साधला. यासोबतच ते हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे 20 टक्के इथेनॉल (E20) असलेले पेट्रोल. यासह, 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 84 पेट्रोल पंपांवर E20 इंधनाची विक्री सुरू होईल. सरकारने 2030 मध्ये ते सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु ते सात वर्षे अगोदर सुरू केले जात आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताचे तेल आयात सुमारे $119 अब्ज रुपयांची होती.

भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. देशाचा मोठा पैसा कच्च्या तेलाच्या आयातीत जात असतो. हे ओझे कमी करण्यासाठी सरकार नवनवीन मार्ग शोधत आहे. देशात द्रुतगती मार्ग बांधले जात आहेत ज्यामुळे वेळेची बचत होईल, इंधनाचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. यासोबतच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही सरकारने आखली आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल (E 10 Fuel) मिसळण्याचे उद्दिष्ट पाच महिने आधीच पूर्ण करण्यात आले होते. 20 टक्के इथेनॉल (E 20 Fuel) मिश्रणाचे मूळ लक्ष्य 2030 होते परंतु ते आधी 2025 आणि आता 2023 असे बदलण्यात आले आहे.

इथेनॉलचे मिश्रण का महत्त्वाचे आहे?

ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर भर देत आहे. 2013-14 पासून देशात इथेनॉलचे उत्पादन सहा पटीने वाढले आहे. यामुळे देशाचे 54,000 कोटी रुपयांचे परकीय चलन तर वाचलेच पण CO2 उत्सर्जन (Carbon dioxide Emission) 318 लाख मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. 2014 ते 2022 पर्यंत शेतकर्‍यांना 49,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण देशात E-20 इंधन विक्रीस आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, तेल विपणन कंपन्या 2G-3G इथेनॉल प्लांटची स्थापना करत आहेत.