Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Energy conservation India: 2022 मध्ये भारताने किती युनिट वीज वाचवली? BEE च्या अहवालातून माहिती समोर

Bureau of Energy Efficiency

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलरसह अनेक विजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. इलेक्ट्रिक उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. तसेच सर्वच क्षेत्रात ऊर्जेचा अपव्यय होऊ नये यासाठी ही BEE प्रयत्नशील आहे. या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये 2022 वर्षात भारताने किती ऊर्जेची बचत केली याची माहिती देण्यात आली आहे.

Bureau of Energy Efficiency: ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी म्हणजेच BEE ही सरकारी संस्था देशात वीज बचत करण्यासाठी विविध उपक्रम राबवते. तुम्ही फ्रीज, एसी, टीव्ही आणि इतरही इलेक्ट्रिक उपकरणांवर जे स्टार रेटिंग पाहता त्या संबंधित नियम आणि धोरणे आखण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये 2022 वर्षात भारताने किती ऊर्जेची बचत केली याची माहिती देण्यात आली आहे.

किती युनिट वीज वाचवली?

भारताने 2022 वर्षात 249 कोटी युनिट वीज वाचवली. म्हणजेच 1.60 लाख कोटी रुपये किंमतीची वीज बीलात बचत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. नॅशनल एनर्जी डेटा: सर्व्हे अँड अॅनालिसिस असे या अहवालाचे नाव आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अख्यत्यारित BEE ही संस्था येते. केंद्रीय मंत्री आर. के सिंह यांनी शुक्रवारी हा अहवाल सादर केला.

ऊर्जा बचतीसाठी विविध अभियान

हा अहवाल निती आयोग आणि ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. ऊर्जा बचतीच्या विविध अभियानामुळे देशाने 1,60,721 कोटी रुपयांची वीज वाचवली, असे या अहवालात म्हटले आहे. सोलार ऊर्जा आणि नैसर्गिक वायू यांचा वापर देशात किती होतो याची निश्चित आकडेवारी नसल्याचे सिंह यांनी म्हटले. भविष्यात या ऊर्जा स्रोतांचा किती वापर झाला याची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ऊर्जा आयात कमी व्हावी हे सरकारचे ध्येय असल्याचे सिंह यावेळी म्हणाले.

BEE संस्थेचे मागील काही महिन्यांतील महत्त्वाचे निर्णय

काही महिन्यांपूर्वी ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी या संस्थेने फ्रीजला लागणाऱ्या ऊर्जेबाबतच्या नियमांमध्ये बदल केला. इलेक्ट्रिक उपकरणाला किती ऊर्जा लागते हे दर्शवण्यासाठी रेटिंग देण्यात येते. जेवढी जास्त रेटिंग तेवढी कमी ऊर्जा वापरली जाते. त्यामध्ये फ्रीजचाही समावेश आहे.  मात्र, आता फ्रीजच्या आतमधील अती शीत विभागाला (फ्रिजर) थंड ठेवण्यासाठी किती ऊर्जा खर्च होते हे सुद्धा उत्पादक कंपन्यांना जाहीर करावे लागणार आहे.

सिलिंग फॅनवर यापूर्वी स्टार रेटिंग नव्हते. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी BEE ने फॅन निर्मिती कंपन्यांना फॅन किती ऊर्जा वापरतो यासंबंधीचे रेटिंग लेबल लावण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे फॅनच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या. तसेच वाहन निर्मिती कंपन्यांनी गाड्यांच्या इंधन वापराच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाईल, असे म्हटले आहे.

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. तसेच सर्वच क्षेत्रात ऊर्जेचा अपव्यय होऊ नये यासाठी ही BEE प्रयत्नशील आहे.