Which Country is Largest Consumer of Gold: वर्ल्ड कौन्सिलचा अहवाल (World Council Report) जाहीर झाला असून, जगभरातून 2021 मध्ये सोने खरेदी करण्यामध्ये भारताने दुसऱ्या क्रमांक मिळविला असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतीय नागरिक एकीकडे कोरोनासारख्या आजाराचा सामना करत असलेल्या कठीण परिस्थितीतदेखील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची तेजी होती. याच ग्राहकांनी नेमकी किती टन सोने खरेदी केले व सोने खरेदीमध्ये पहिला क्रमांकावर कोण आहे, हे जाणून घेऊयात.
भारताने 2021 मध्ये किती सोने खरेदी केले (How much Gold did India Buy in 2021)
वर्ल्ड कौन्सिलच्या अहवालनुसार, भारताने 2021 यावर्षी जवळजवळ 611 टन सोने खरेदी केले असल्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण जगात सोने खरेदीमध्ये भारत (India) हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर चीन (China ) आहे. चीनने 2021 वर्षात जवळपास 673 टन सोन्यांच्या दागिन्यांची खरेदी केली आहे.
लग्नासाठी अधिक सोने खरेदी (Buy more Gold For Wedding)
भारतात सर्वाधिक सोन्यांची खरेदी ही लग्नसोहळयासाठी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जवळजवळ 55 टक्के सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले आहेत. 22 कॅऱेट सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे 80 टक्क्यांवर असल्याचे दिसत आहे. दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांनादेखील मोठी मागणी आहे. त्यांची खरेदी ही 45 टक्क्यांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे सोन्याची खरेदी करण्यात ग्रामीण भागात अग्रेसर असल्याचे दिसत आहे. या भागाने सुमारे 58 टक्के सोने खरेदी केले आहे. तर 40 टक्के सोन्याची खरेदी ही दक्षिण भारतातून करण्यात आली आहे.
भारतीय दागिन्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी (Indian Jewelery is most in Demand in America)
भारतीय कारागिरांनी बनविलेल्या आकर्षक दागिन्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी असल्याचे सांगितले गेले आहे. यापूर्वी ही मागणी युएईमध्येदेखील होती. आता अमेरिकेने युएईलादेखील मागे टाकले आहेत. 2019 मध्ये भारताने 12 अब्ज अमेरिकी डाॅलर किंमतीचे दागिने निर्यात केले आहे. भारतीय दागिन्यांना मुख्यत्वे अमेरिका, सिंगापूर, युके, युएई व हाॅगकाॅंग या देशांतून मोठी मागणी असल्याचे सांगतिले गेले आहे.