एप्रिल ते नोव्हेंबर 2022 (April - November 2022)आठ महिन्यांच्या काळात भारतातून 50,000 कोटी रुपये मूल्याचे मोबाईल फोन (Smart Phones) निर्यात (Export) झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीपेक्षा हे मूल्य 110% नी जास्त आहे. तर मागच्या संपूर्ण आर्थिक वर्षांत झालेल्या निर्यातीपेक्षा हा आकडा 10% मोठा आहे. यातले बहुतेक फोन हे अॅपल (Apple) आणि सॅमसंग (Samsung) कंपनीचे आहेत.
फॉक्सकॉन (Foxconn), पेगाट्रॉनचे (Pegatron)तामिळनाडूत (Tamilnadu) असले दोन कारखाने (इथं अॅपल फोन तयार होतात) आणि विस्ट्रॉनच्या (Vestron) कर्नाटकातल्या (Karnataka) कारखान्यातून (सॅमसंग) यातलं सर्वाधिक मोबाईल उत्पादन झालं आहे.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतात बनलेल्या मोबाईल फोनपैकी 40% फोन हे अॅपल कंपनीचे (Apple Inc) आहेत. आणि हे फोन युरोप (Europe), पश्चिम आशिया (Western Asia) तसंच इतर आशियाई देशांमध्ये निर्यात होतात. सॅमसंग आणि इतर कंपन्यांचे फोन हे उर्वरित 60%मध्ये येतात.
अॅपल आणि सॅमसंग कंपन्यांनी भारताबरोबर आपल्या PLI (Product Linked Incentive Schene) या योजनेअंतर्गत करार केला आहे. यापूर्वी, सॅमसंग ही कंपनी भारतातून आपले फोन तयार करून घेण्यात आघाडीवर होती. पण, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अॅपल कंपनीने सॅमसंगला याबाबतीत मागे टाकलं. अॅपलने यावर्षी भारताला 43,000 रुपयांच्या फोन निर्मितीचं कंत्राट दिलं.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते PLI योजनेचा भारताला फायदा झाला आहे. आणि सप्टेंबर 2022 पासून भारतातून दर महिन्याला 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालाची निर्यात झाली आहे. आणि ही वाढ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातून झाली आहे हे विशेष. 2018 पर्यंत भारताच्या एकूण निर्यातीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीचा क्रमांक 10वा होता. पण, आता हा क्रमांक वाढून सहावा झाला आहे.
याचं एक कारण सेमीकन्डक्टर क्षेत्रात भारतात झालेली गुंतवणूक. आणि दुसरं म्हणजे कोव्हिडनंतरच्या काळात चीनमध्ये मोठ्या कंपन्यांची कमी झालेली गुंतवणूक असंही आहे. चीनच्या काही ऑर्डर भारताला मिळाल्या आहेत.