Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Textile PLI 2.0: वस्त्रोद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा दुसरा टप्पा लवकरच, लघु उद्योजकांना प्राधान्य देणार

Textile PLI 2.0 :

Textile PLI 2.0: देशांतर्गत दर्जेदार वस्त्र उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा दुसरा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किम 2.0 चा (production-linked incentive scheme-PLI) प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कापड उत्पादनाला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत सुरु केलेल्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किमचा (production-linked incentive scheme-PLI) दुसरा टप्पा लवकरच जाहीर केला जाणार आहे. या योजनेत विशेषकरुन लघु आणि मध्यम स्वरुपातील टेक्सटाईल उद्योजकांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किम 2.0 मध्ये पात्र होण्यासाठी गुंतवणूक मर्यादा 15 कोटी आणि 40 कोटी इतकी असेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात टेक्निकल टेक्सटाईल आणि मॅनमेड फायबर या उद्योगांसाठी गुंतवणूक मर्यादा 100 कोटी आणि 300 कोटी इतकी होती. आता ही मर्यादा कमी करण्यात आल्याने जास्तीत जास्त उद्योजकांना या योजनेत सहभागी होता येईल.

पहिल्या योजनेत वस्त्रोद्योगातील 32 कंपन्यांनी लाभ घेतला होता. या कंपन्यांनी 1500 ते 1700 कोटींची गुंतवणूक केली होती. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लघु आणि मध्यम उद्योजकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या उद्योजकांना भांडवली सहाय्य आणि मशिनरीसाठी अर्थसहाय्य केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. PLI पहिल्या योजनेत 64 प्रस्ताव मंजुर करण्यात आले होते. त्यातून 19798 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले होते.

आता प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (PLI 2.0) सरकारने 4000 कोटींची तरतूद केली आहे. यात कापड उद्योगात आवश्यक इतर छोट्या वस्तू जसे की लेस, बटन,चैन (Zippers) यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

पुढील पाच वर्षात टेक्सटाइलसाठी सरकारकडून 10683 कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. उत्पादनाला चालना मिळाल्याने या क्षेत्रात जवळपास 3 लाख कुशल रोजगार संधी निर्माण होतील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योगात 19000 कोटींची गुंतवणूक होऊ शकते. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांना योजनेचा मोठा फायदा होणार आहे.  

Textile PLI योजनेबाबत विचारले जाणारे सर्वसाधारण प्रश्न( FAQ about Textile PLI Scheme)

Textile PLI योजना काय आहे? (What is Textile PLI Scheme)

प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हज स्किम ही टेक्सटाइल उद्योगासाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश हस्तमागाचे कापड, तयार कपडे आणि यंत्रमागाची उत्पादनांना अर्थसहाय्य करुन जागतिक दर्जाचे कापड तयार करणे आणि निर्यातीसाठी सक्षम करणे हा आहे.

आतापर्यंत या योजनेचा कोणत्या कंपन्यांनी लाभ घेतला? (Which Textile Companies Benefit from PLI Shceme?

सरकारच्या माहितीनुसार PLI योजनेचा जवळपास 32 कंपन्यांनी लाभ घेतला आहे. यात कपूर ऑफ ट्रस्टलाईन, रेमंड, बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चरिंग, बॉम्बे रेयॉन फॅशन्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, वेल्सपन इंडिया, केपीआर मिल्स, नितित स्पीनर्स आणि गोकलदास एक्सपोर्ट या नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद आहे? (Budgetary Outlay for PLI Textile)

वस्त्रोद्योगासाठीच्या पीएलआय योजनेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 11000 कोटींची तरतूद केली आहे.