Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Made Cough Syrup : उझबेकिस्ताननेही मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपला धरलं जबाबदार 

Indian Cough Syrup Banned

India Made Cough Syrup : गांबिया देशा पाठोपाठ आता उझबेकिस्तान देशानेही देशातल्या काही मुलांच्या मृत्यूसाठी भारतात बनलेल्या कफ सिरपला दोष दिला आहे. या गंभीर आरोपामुळे देशात या फार्मा कंपनीच्या कफ सिरपची चौकशी होण्याची चिन्ह आहेत.

उझबेकिस्तान (Uzbekistan) देशाने भारतीय फार्मा कंपनी (Indian Pharma Company) मॅरियन बायोटेकवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी बनवलेल्या कफ सिरपमुळे (Cough Syrup) उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांचा श्वासाच्या विकाराने (Respiratory Disease ) मृत्यू झालं असं तिथल्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तसं प्रसिद्धीपत्रक उझबेकिस्तान प्रशासनाने काढलं आहे.    

‘देशातल्या 21 बालमृत्यूंपैकी 18 मुलांच्या मृत्यूसाठी त्यांनी सेवन केलेलं कफ सिरप कारणीभूत आहे,’ असं या पत्रकात म्हटलं आहे . DOC-1 मॅक्स सिरप हे या औषधाचं नाव आहे. आणि मुलांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दिवसांतून 3-4 वेळा असं सात दिवस हे कफ सिरप देण्यात आलं होतं. शिवाय कफ सिरपचा प्रत्येक डोस 2.5 ते 5 मिलीलीटर या ठरलेल्या मात्रेपेक्षा जास्त होता, असंही या पत्रकात म्हटलं आहे.    

या कफ सिरपमध्ये इथिलिन ग्लायकॉल हे रासायनिक द्रव्य आढळल्याचं उझबेकिस्तान सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हे मूलद्रव्य विषारी आहे. आणि त्याचं सेवन केल्यावर मुलांमध्ये उलट्या, चक्कर तसंच आकडी येणं असे बदल दिसू लागले. काही मुलांच्या मूत्रपिंडावरही परिणाम झाला, असं पत्रकात लिहिलं आहे.    

अर्थातच, यानंतर तिथली सर्व फार्मा दुकानं आणि रुग्णालयांमध्ये या कफ सिरपचा वापर बंद करण्यात आला आहे. आता भारत सरकारच्या औषध मानांकन नियामक संस्थेनंही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी या औषधाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच उझबेकिस्तान सरकारकडूनही तिथल्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीचे अहवाल मागितले आहेत.    

मॅरियन फार्मा कंपनी बनवत असलेलं हे कफ सिरप भारतात दिलं जात नाही.