Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sugarcane planting machine: माहित करून घ्या, ऊसाच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांबद्दल!

Sugarcane planting machine

Sugarcane planting machine: भारतात उसाची लागवड वैदिक काळापासून सुरू आहे. उसाचा व्यावसायिक वापर केला जातो. म्हणूनच उसाच्या आधुनिक शेतीला व्यावसायिक शेती म्हणतात.

Sugarcane planting machine: भारतात उसाची लागवड वैदिक काळापासून सुरू आहे. उसाचा व्यावसायिक वापर केला जातो. म्हणूनच उसाच्या आधुनिक शेतीला व्यावसायिक शेती म्हणतात. उसाच्या शेतीतून एक लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. ऊस शेतीबद्दल असे म्हटले जाते की ही सुरक्षित शेती आहे कारण प्रतिकूल परिस्थितीचा ऊस शेतीवर अजिबात परिणाम होत नाही. भारतात ऊस पिकासाठी वर्षातून दोनदा पेरणी करता येते. या दोन पिकांना वसंत ऋतु आणि शरद ऋतूतील पिके म्हणतात. शरद ऋतूतील उसाची पेरणी 15 ऑक्टोबरपर्यंत केली जाते, तर वसंत ऋतूसाठी उसाची पेरणी 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत केली जाते. उस लागवडीसाठी लागणाऱ्या यंत्रांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेऊया. 

यंत्र (Machine tool) 

  • ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर
  • ट्रॅक्टरचलित व्हायब्रेटिंग सब सॉयलर
  • ट्रॅक्टरचलित रोटोरीजर
  • ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र 
  • विद्युत मोटारचलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र
  • स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र
  • ट्रॅक्टरचलित इंटर रो रोटाव्हेटर
  • नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर
  • ट्रॅक्टरचलित मल्चर

ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर 

काळी, क्षारयुक्त, पाणी असलेली जमिनीतील अधिक पाण्याचा क्षारांचा निचरा करण्यासाठी मोल नांगर उपयोगी ठरतो. 45  एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येऊ शकतो. 

ट्रॅक्टरचलित व्हायब्रेटिंग सब सॉयलर

क्षारयुक्त जमिनीतील पाण्याचा निचरा करून, पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी उपयोग होतो.  45  एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.

ट्रॅक्टरचलित रोटोरीजर

45 एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे (Tractor) चालवता येते. एकाच वेळी जमीन भुसभुशीत करणे आणि सरी पाडणे अशा दोन प्रकारच्या मशागती करता येतात. वेळेची बचत होते. 

ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र (Sugarcane planting machine)

45  एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते. या यंत्राने सपाट जमिनीमध्ये दोन रिजरच्या साह्याने सऱ्या पाडणे, अखंड उसाचे तुकडे करून बेणे सरीत पाडणे, बेण्यावर माती पसरणे ही सर्व कामे एकाच वेळी केली जातात. यामुळे वेळेची आणि आर्थिक बचत होते.
या यंत्रामुळे एका दिवसात 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करता येते.

विद्युत मोटारचलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र (Electric motorized cane weed harvester)

एका तासात 6000 ते 6500 ऊस बेणे तोडली जातात. सिंगल फेज, 1अश्‍वशक्तीच्या विद्यूत मोटारवर यंत्र चालविता येते. 

ट्रॅक्टरचलित इंटर रो रोटाव्हेटर

ऊस पिकाच्या आंतरमशागतीसाठी उपयुक्त. एकाच वेळी दोन ओळींतील आंतर मशागत व तण काढणी करता येते. 

नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर

टाकीची क्षमता 11.5 लिटर. फवारणीसाठी (Spray) लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत. मोटारचलित असल्यामुळे श्रमातही वाचतात.

ट्रॅक्टरचलित मल्चर

40  एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते. पीक कापणीनंतर शेतातील पीक अवशेष, पाला पाचोळा, काड्या, गवत, तण यासर्वांचे बारीक तुकडे करते.
अवशेषांचे बारीक केलेले तुकडे जमिनीत मिसळण्याचे कामसुद्धा या यंत्राद्वारे केले जाते. त्यामुळे शेतामध्ये लवकर कुजून सेंद्रिय खत मिळते.