India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमधून भारतात होणाऱ्या आयातीत 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी दुसरीकडे 2022 मध्ये भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत घट झाली आहे. तसेच देशाची व्यापार तूट प्रथमच 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.
बीजिंग स्थित जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्स (GAC) ने शुक्रवारी (13 जानेवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार गेल्या वर्षी 8.4% ने वाढून 135.98 अब्ज डॉलर झाला आहे. यामध्ये भारतातून 118.5 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ते 97 अब्ज डॉलर होते. भारताची चीनला होणारी निर्यात या कालावधीत 17.48 टक्क्यांनी घसरलेली आहे, जी मागील वर्षात 28.1 अब्ज डॉलर होती. या प्रकारची व्यापार तूट 2022 मध्ये 101.02 अब्ज डॉलर इतकी वाढली. 2021 मधील 69.4 बिलियन डॉलरच्या तुलनेत त्यात 45% वाढ नोंदवली गेली.
चीनच्या विदेशी व्यापारात होतेय वाढ
चीनचा एकूण विदेशी व्यापार 2022 मध्ये 7.7% वाढून 6.25 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल. या कालावधीत निर्यातीत 10.5% वाढ नोंदवली गेली. चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ASEAN सोबतचा चीनचा व्यापार 11.2% वाढून 975.34 अब्ज डॉलर झाला आहे. चीनच्या व्यापारी भागीदारांमध्ये युरोपीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनचा त्यांच्यासोबतचा व्यापार 2.4% वाढून 847.32 अब्ज डॉलर झाला आहे. अमेरिकेचा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 0.6% ने वाढून 759.42 अब्ज डॉलर झाला आहे. भारतातील मागणीत सुधारणा, मध्यवर्ती वस्तूंच्या आयातीत वाढ आणि वैद्यकीय पुरवठा यासारख्या नवीन श्रेणीतील वस्तूंच्या आयातीमुळे दोन्ही देशांमधील व्यापाराने 2021 या वर्षातील विक्रमी पातळी ओलांडली आहे. विश्लेषक चीनमधून भारताच्या वाढत्या आयातीकडे चिंतेची बाब म्हणून पाहतात, जे त्यांच्या मते प्रमुख वस्तूंच्या श्रेणीसाठी चीनवर देशाचे निरंतर अवलंबित्व प्रतिबिंबित करते.