भारतीय चित्रपट सृष्टीतील T-Series चे निर्माते विनोद भानुशाली यांच्या मुंबईतील बिकेसी परिसरातल्या कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी 19 एप्रिल 2023 रोजी रात्री धाड टाकली. विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) यांच्यावर कर चुकवेगिरी केल्याचा आरोप आहे. T-Series सोबतच अन्य काही चित्रपट निर्मात्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली आहे. स्टँप ड्युटी चुकविल्याचा ठपका त्यावेळी ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीला सामोरे जावे लागत आहे. परंतु अजूनही प्राप्तीकर विभागाने छापेमारीचे तपशील जाहीर केलेले नाही.
Mumbai | Income Tax raids underway at the office of producer Vinod Bhanushali and some other production houses of Bollywood since today morning, over allegations of tax evasion. Raids underway at the premises of Jayantilal Gada too: Income Tax
— ANI (@ANI) April 19, 2023
RRR चित्रपटाच्या वितरक कंपनीवर छापा
चित्रपट निर्माते आणि वितरक जयंतीलाल गाडा (Jayantilal Gada) यांच्या कार्यालयावर देखील काळ रात्री आयकर विभागाने छापा टाकला आहे. 1982 साली त्यांनी पॉप्युलर एंटरटेनमेंट नेटवर्क, प्रा. लि. (PEN) नावाने ते एक चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. सध्या त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा धवल गाडा हे देखील या कंपनीचे काम बघतात. 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या RRR चित्रपटाचे वितरण देखील गाडा यांच्या PEN कंपनीकडेच होते. या चित्रपटाने देशोविदेशात मोठा गल्ला कमावला होता. तसेच RRR ने थेट ऑस्कर पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. RRR चित्रपटाच्या निमित्तानेच ही छापमारी केली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Income Tax Dept Raids Offices Of Producer Jayantilal Gada And Vinod Bhanushali In Mumbai!
— Box Office Worldwide (@BOWorldwide) April 19, 2023
Link to read: https://t.co/8W1pjUYJ41#IncomeTax @IncomeTaxIndia @jayantilalgada @vinodbhanu pic.twitter.com/6XoAIYDRsI
आयकर विभागाच्या या कारवाईमुळे इतर चित्रपट निर्मात्या कंपन्या देखील सध्या सतर्क झाल्या आहेत. आयकर संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास कंपन्यांनी युद्ध पातळीवर काम करण्यास सुरुवात केली असल्याचे कळते आहे. या छापेमारीत प्राप्तीकर विभागाला काय हाती लागलेल्या माहितीचा तपशील अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही.