Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rental income: घर भाड्यातून मिळणारे पैसे ठरू शकतात तुमच्या म्हातारपणाचा आधार, जाणून घ्या सविस्तर

Rental income

Rental income: घर भाड्याने (House rent) देणारे जास्तीत जास्त लोक हे सेवानिवृत्त, म्हातारे, ज्यांची मुले विदेशात आहे असे असतात. त्याच पैशातून आपला उदरनिर्वाह करून वाचलेले पैसे उत्तम परतावा (Great returns) मिळेल अशात गुंतवणूक (Investment) करू शकता.

Rental income: नोकरी, व्यवसाय करून प्रत्येक जण आपला उदरनिर्वाह करतात. यासोबतच मोठमोठ्या शहरांमध्ये आता घर भाड्याने देणे आणि त्यातुन उत्पन्न मिळवणे हा सुद्धा एक व्यवसाय होऊन बसला आहे. घर भाड्याने देऊन मिळालेल्या उत्पन्नातील (Rental income) काही भाग तुम्ही गुंतवून त्याला म्हातारपणाचा आधार बनवू शकता. तुम्ही भाड्याच्या उत्पन्नाचा काही भाग तुमच्या वयानुसार आणि जोखीम (risk) घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य वेळी उत्तम परतावा देणार्‍या गुंतवणूक योजनेत गुंतवू शकता. जाणून घ्या कुठे करू शकता गुंतवणूक. 

साधारणतः घर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवणे हा उत्पन्नाचा सर्वात चांगला सोर्स असू शकतो. बाहेर गावातून नोकरी आणि शिक्षणासाठी आलेल्या मुलांना, त्यांच्या कुटुंबांना राहायला जागा देणे यातून पुण्य आणि उत्पन्न (virtue and income) दोन्हीही मिळते. प्रत्येक जणाला उत्पन्न खर्च या गोष्टी लागलेल्याच आहे, पण उत्पन्नातून खर्च काढून उरलेले पैसे भविष्यासाठी गुंतवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. घर भाड्याने देणारे जास्तीत जास्त लोक हे सेवानिवृत्त (Retired), म्हातारे, ज्यांची मुले विदेशात आहे असे असतात. त्याच पैशातून आपला उदरनिर्वाह करून वाचलेले पैसे उत्तम परतावा मिळेल अशात गुंतवणूक करू शकता. 

तरुण असतांनाच करू शकता म्हातारपणाची सोय….. (You can make provision for old age only when you are young.)

तुम्ही भाड्याच्या बदल्यात मिळालेले पैसे चांगल्या परतावा (Good returns) देणाऱ्या गुंतवणूक योजनेत गुंतवू शकता. भाड्याचे उत्पन्न एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवू शकतात. दीर्घकालीन योजनेत भाड्याच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग गुंतवून त्या गुंतवणुकीच्या रकमेवर जास्त परतावा मिळू शकतो. एसआयपी गुंतवणूक (SIP investment) वैविध्यपूर्ण आहे. यामध्ये, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मीडियम कॅप (Large Cap, Small Cap, Medium Cap) यांसारख्या सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कॅटेगरीमध्ये निधीचे वाटप केले जाते. 

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाचा काही भाग शेअर बाजारातही (stock market) गुंतवू शकता. याशिवाय भाड्याच्या उत्पन्नाचा काही भाग दुरुस्ती आणि देखभालीसाठी ठेवता येतो आणि गरज भासल्यास वापरता येतो. एकूणच, भाड्याच्या उत्पन्नाचा काही भाग लिक्विड फंड SIP किंवा आवर्ती ठेव (RD) योजनेत गुंतवणे सुद्धा योग्य ठरू शकते. 

वय वाढलं की जबाबदारी वाढते का? (Does age increase responsibility?)

वय वाढलं की जबाबदारी नक्कीच वाढते, पण जबाबदारी वाढण्याची वाट बघत बसल्यापेक्षा लहानपणापासूनच आपल्या भविष्याची शिदोरी जमा करता आली पाहिजे. लहान असतांना मिळालेली पॉकेटमनी, खाऊचे पैसे सुद्धा जमा करून गुंतवणूक करता येऊ शकते. जीवनशैलीत (Lifestyle) झपाट्याने होणारे बदल आणि वाढत्या वयानुसार गुंतवणुकीच्या पद्धतीही बदलायला हव्यात. जर तुम्ही वयाची 35 वर्षे ओलांडली असाल तर हळूहळू तुमच्या गुंतवणुकीची पद्धत तुम्हाला बदलवावी लागेल.