Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate: देशातील कोणत्या शहरात घर खरेदी करणं स्वस्त आणि कोणत्या शहरात महाग? जाणून घ्या

Real Estate

Real Estate: देशातील कोणत्या शहरात घर स्वस्त आणि कोणत्या शहरात महाग हे ठरवण्यासाठी हाऊसिंग अफोर्डेबिलिटी इंडेक्सची मदत घेतली जाते.

Real Estate: "अपना घर अपना होता है" असं आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं आहे. प्रत्येकजण स्वतःच घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभर अफाट कष्ट घेतात. बऱ्याच लोकांचं हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाही. चालू महागाई(Inflation) आणि येणार पगार(Salary) यातील योग्य समतोल साधून हा निर्णय घ्यावा लागतो. बरेच जण तर एका शहरातून दुसऱ्या शहरात कामधंद्याच्या दृष्टीने जातात आणि तेथेचं सेट होण्याचा विचार करतात. अशा वेळी स्वतःच घर असणं केव्हाही चांगलं. पण तुम्हाला माहिती आहे का? देशातील कोणत्या शहरात घर खरेदी करणं स्वस्त आणि कोणत्या शहरात महाग आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

तुम्हाला माहितीच असेलचं की, प्रत्येक शहराच्या विकासानुसार घराच्या किंमती(House Price) ठरत असतात. कोणतं घर स्वस्त आणि कोणतं महाग हे सर्व शहराचा विकास, सामाजिक पायाभूत सुविधा(Social Infrastructure), कनेक्टिव्हीटी(Connectivity) यांसारख्या मुद्द्यावर आधारित असतं. त्यानुसारच शहरातील घराच्या किंमती ठरतात. भारतातील कोणत्या शहरात घर घेणं स्वस्त आणि कोणत्या शहरात घर महाग यासंदर्भात जाणून घेऊयात.  

अहमदाबाद(Ahmedabad)

गुजरातची राजधानी असलेलं 'अहमदाबाद' शहर हे हाऊसिंग अफोर्डेबिलिटी इंडेक्समध्ये(Housing Affordability Index) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 22 टक्के असून 2019 पासून भारतातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये हाऊसिंग मार्केटच्या दृष्टीने हे सर्वात स्वस्त शहर असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे(Pune)

पुणे हे सांस्कृतिक शहर(Cultural city) तर आहेच मात्र योबत स्वस्त घरांच्या बाबतीत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्समध्येही सुधारणा पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये पुण्याचा परवडणारा निर्देशांक 26 टक्के इतका होता.

चेन्नई(Chennai)

पुण्याबरोबरच चेन्नईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स यावर्षात 26 टक्के असून गेल्या वर्षी तो  25 टक्के इतका होता. 2019 मध्ये कोविड आजारापूर्वी तो 29 टक्के इतका होता. परवडणाऱ्या घरांच्या यादीत चेन्नई तिसऱ्या स्थावर आहे.

बंगळुरू(Bangalore)

परवडण्याच्या घरांच्या बाबतीत मोठ्या शहरांमध्ये अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईनंतर बंगळुरु चौथ्या स्थानी आहे. त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 28 टक्के असून तो गेल्या वर्षी 26 टक्के इतका झाला आहे. आयटी क्षेत्रातील हब म्हणून आपण बंगळूरला ओळखतो.

दिल्ली(Delhi)

भारताची राजधानी या लिस्टमध्ये पाचव्या स्थानी आहे. दिल्ली शहराचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 30 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 28 टक्के होता पण तुम्हाला माहिती आहे का? दिल्ली हे महागड्या निवासी बाजारपेठांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते .

हैद्राबाद (Hyderabad)

दाक्षिणात्य चित्रपटाची भूमी म्हणून हैद्राबादची ओळख आहे. परंतु घरांच्या परवडणाऱ्या दरा बाबतीत हैदराबाद हे महागडे शहर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मुंबई(Mumbai)

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून हे शहर भारतातील प्रमुख शहरांमधील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईत घर घेणे सर्वात महाग असून त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 2021 मध्ये 53 टक्के होता, जो 2022 मध्ये 56 टक्क्यांवर आला आहे. मात्र असे असले तरीही उदरनिर्वाहाची विपुल साधने मुंबईत उपलब्ध आहेत. म्हणूनच तर मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते.