यापूर्वी आपण बेस सॅलरी, नेट सॅलरी आणि ग्रॉस सॅलरी म्हणजे काय? ते पाहिले. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला पगारावर टॅक्स कसा लागतो हे माहीत असणे गरजेचे आहे. तुमच्या पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? (What part of the salary is taxable?) करपात्र वेतन म्हणजे काय? (What is taxable salary?) या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेवूया.
करपात्र उत्पन्न म्हणजे काय?
तुमची नेट सॅलरी तुमच्या हातात आल्यावर, तुमची बचत आणि वजावट त्यातून वजा केली जाते. जसे 80 सी अंतर्गत केलेली गुंतवणूक तुमच्या वतीने कर वाचवण्यासाठी कमी केली जाते, तुम्ही भरलेला आरोग्य विमा आणि जीवन विमा प्रीमियम कमी केला जातो, कोणत्याही प्रकारचा तुम्ही वैद्यकीय खर्च दाखवल्यास, ते देखील वजा केले जातात. यासोबतच कोणत्याही मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न किंवा इतर कोणत्याही स्रोतातून मिळणारे उत्पन्नही जोडले जाते. या सर्व प्रकारानंतर, प्राप्तिकरात मिळणार्या सूटची रक्कम थेट कमी केली जाते. या सगळ्यानंतर जे उत्पन्न उरते ते करपात्र उत्पन्न असते, ज्यावर तुम्हाला कर भरावा लागतो.
पगाराच्या कोणत्या भागावर कर आकारला जातो?
तुम्हाला मिळणाऱ्या पगाराला ग्रॉस सॅलरी म्हणतात. सर्व भत्ते, कपात आणि 80C अंतर्गत केलेली गुंतवणूक या पगारातून वजा केली जाते. या सगळ्यानंतर करपात्र उत्पन्न येते. या करपात्र उत्पन्नावर कर आकारला जातो. जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही, कारण तरतुदींनुसार तुम्हाला 2.5 लाख रुपयांवर कर सूट आणि उर्वरित 2.5 लाख रुपयांवर कर सवलत मिळते.
पगारातून कर कसा कापला जातो?
जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या पगारातून टॅक्स कसा कापला जातो? हे माहीत असेलच, पण ज्यांना अजून नोकरी मिळालेली नाही किंवा नुकतीच नोकरी मिळाली आहे, त्यांच्या पगारातून टॅक्स कसा कापला जातो? हा प्रश्न त्यांना सतावत असेल. एम्प्लॉयरकडून थेट पगारातून कर कापला जातो आणि तुमच्या वतीने कर विभागात जमा केला जातो. पगारावर कर कपात करण्यापूर्वी, एम्प्लॉयर त्याच्या कर्मचार्यांनी कर वाचवण्यासाठी केलेल्या बचतीचा पुरावा देखील मागतो, जसे की आरोग्य विमा प्रीमियम, जीवन विमा प्रीमियम, एफडीमधील गुंतवणूक, घराचे भाडे आणि इतर अनेक गोष्टी. या आधारे तुमचा पगार करपात्र आहे की नाही हे ठरवले जाते. जर पगार करपात्र असेल तर तुम्हाला टीडीएस कापून पगार मिळतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा कर कमी-जास्त प्रमाणात कापला गेला आहे, तर तुम्ही आयकर रिटर्न भरताना रिफंड घेऊ शकता किंवा अतिरिक्त कर भरू शकता.