Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Favorite Property Locations: घर खरेदीसाठी 2022 मध्ये मुंबई - पुणे शहराला सर्वाधिक पसंती

favorite property location

2022 वर्षामध्ये मुंबई, पुणे आणि बेंगळुरू ही मालमत्तांसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे उदयास आली आहेत. मुंबई एमएमआरमध्ये अंधेरी पश्चिम, खारघर, मुलुंड पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे घर खरेदीसाठी सर्वाधिक शोधली गेलेली पाच ठिकाणे आहेत.

2022 वर्षामध्ये मुंबई, पुणे आणि बेंगळुरू ही मालमत्तांसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे उदयास आली आहेत. मुंबई एमएमआरमध्ये अंधेरी पश्चिम, खारघर, मुलुंड पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे घर खरेदीसाठी सर्वाधिक शोधली गेलेली पाच ठिकाणे आहेत. मॅजिकब्रिक्सच्या 'How India Searched for Properties during 2022' या अहवालातून ही बाब समोर आली. याच अहवालानुसार, 2022 मध्ये सुमारे 80% गृहखरेदीदारांनी अपार्टमेंट शोधले होते जे 2021 मध्ये 67 टक्के होते. म्हणजेच 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये घर खरेदीदारांमध्ये उत्साह दिसून आला.

2022 हे भारतीय रहिवासी मालमत्ता खरेदी विक्री क्षेत्रातील वाढीचे वर्ष ठरले आहे. या वर्षात देशातील मालमत्तांच्या मागणी आणि पुरवठ्यात चांगली वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे बेंगळुरू, पुणे आणि मुंबई ही रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी पसंतीची शहरे म्हणून उदयास आली, असे मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै यांनी म्हटले आहे. 

50 लाख ते 1 कोटी या कॅटेगरीतील मालमत्तांना सर्वाधिक पसंती

2022 मध्ये 3 बीएचके आणि त्याहून अधिक बेडरूमच्या सदनिका भारतीय शहरांमध्ये सर्वाधिक शोधल्या गेल्या. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR)आणि पुण्याच्या पश्चिमेकडील परिसरात 2 बीएचकेला सर्वाधिक पसंती देण्यात आली. आकाराच्या बाबतीत सुमारे 36 टक्के घर खरेदीदारांनी 1,000-1,500 चौरसफूट आकाराच्या श्रेणीतील घरांना मागणी होती. 28 टक्के लोकांनी 500-1,000 चौरसफूट आकाराच्या घरांना पसंती दिले. तसेच 35 टक्के गृहखरेदीदारांनी 50 लाख- 1 कोटी रुपये या कॅटेगरीतील मालमत्ता शोधल्या आणि 25 टक्के लोकांनी 1-2 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता शोधल्या.

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर )

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR)मधील 97 टक्के सदनिका खरेदीदारांनी बहुमजली इमारतींचा शोध घेतला. विशेष म्हणजे 2 बीएचके सदनिकांना 

सुमारे 44 टक्के संभाव्य घर खरेदीदारांकडून मागणी होती. त्यानंतर 30 टक्के लोकांकडून 1 बीएचके सदनिकांना मागणी होती.

47% घर खरेदीदारांनी 500-1,000 चौरसफूट आकाराच्या मालमत्तांची मागणी केली तर, 31% लोकांचा 1,000-1,500 वर्गफूट आकाराच्या मालमत्तेकडे कल होता.

अंधेरी पश्चिम, खारघर, मुलुंड पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव पूर्व ही घर खरेदीसाठी सर्वाधिक शोधली गेलेली पाच ठिकाणे आहेत.

पुणे (पीएमआरडीए)

अहवालानुसार 2022 मध्ये 91 टक्के संभाव्य घर खरेदीदारांनी बहुमजली अपार्टमेंटमध्ये घर शोधले.यामध्ये 2 बीएचके युनिट्सला सुमारे 46 टक्के संभाव्य घर खरेदीदारांकडून पसंती मिळाली. 

40 टक्के लोकांनी 3 बीएचके घरांना पसंती देण्यात आली.पुण्यात 39 टक्के घर खरेदीदारांनी 1,000-1,500 वर्गफूट आकाराच्या मालमत्तेत स्वारस्य दाखवले. तर सुमारे 32 टक्के 500-1,000 वर्गफूट आकाराच्या श्रेणीतील मालमत्ता शोधत होते.

सुमारे 25 टक्के पुणेकरांनी 50-75 लाखांच्या श्रेणीतील मालमत्ता शोधल्या, तर 20 टक्के लोकांनी 75 लाख- 1 कोटी किंमतीची मालमत्ता शोधली.
पुण्यातील घरखरेदीसाठी वाकड, बाणेर, खराडी, हडपसर आणि वाघोली हे पाच सर्वाधिक शोधली गेलेली ठिकाणे होती.