Recession Fears: नवीन वर्षाची सुरूवात ही नोकरदार वर्गासाठी बिलकूल चांगली राहिली नाही. कारण जागतिक मंदी (Global Recession) चा मोठा फटका या वर्गाला बसला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच अनेक टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचारी काढले, तर 2022 मध्ये 1 लाख 53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे.
कोणत्या कंपन्यांचा यात समावेश (Which Companies are Involved)
टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी 2023 म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात ही धोकादायक ठरली आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीमधील कर्मचारी मोठया प्रमाणावर काढून टाकण्यात आले आहे. जवळजवळ पंधरा दिवसातच 1 लाख 24 हजार कर्मचारी या कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये अॅमेझाॅन (Amazon), सेल्सफोर्स (Salesforce), काॅइनबेस (Coin Base) व इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आघाडीवर होत्या. क्रिप्टो एक्सचेंज क्रिप्टो डाॅट काॅमदेखील 20 टक्के कर्मचारी काढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारतात ओला (OLA) व स्कीट डाॅट आयने (SKit.ai) तर नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच टाळेबंदीची घोषणा केली होती.
2022 मधील कर्मचारी कपात संख्या (Number of Layoffs in 2022)
2022 ने कर्मचारी कपात करण्याची जी सुरूवात झाली आहे, ती आजगायतदेखील दिसत आहे. मागील वर्षी जवळजवळ 1 लाख 53 हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल. यामध्ये ट्विटर (Twitter), ओरॅकल, स्नॅप (Snap), मेटा (Meta), उबेर (Uber) व इंटेल या मोठया व नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. आता, गुगल (Google) देखील आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहेत. ते यावर्षी साधारण 11000 कर्मचारी नोकरीवरून कमी करणार असल्याचे सांगितले जात आहे. 2023 हे वर्ष टेक कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.