Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2022 Top Ten google search list : 2022 मध्ये गुगलवर लोकांनी सर्वाधिक शोध घेतला व्हॅक्सिन सर्टिफिकेट आणि ई-श्रमिक कार्डचा

2022 Top Ten google search list

गुगलवर How to च्या सर्च यादीमध्ये या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉप टेन टॉपिक्समध्ये व्हॅक्सिन सर्टिफिकेट (Covid vaccine cirtificate) आणि ई-श्रमिक कार्ड (e shramik card) कसं तयार करावं याचा समावेश आहे.

गुगलवर लोक सर्वाधिक काय शोधतात याची यादी समोर आली आहे. त्यानुसार 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या यादीत बहुतेक लोक कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे हे शोधण्याचा प्रयत्न करताना आढळले. तर लसीकरण प्रमाणपत्राव्यतिरिक्त, पहिल्या दहा (Top Ten) यादीत ई-श्रमिक कार्ड कसे बनवायचे (e sharmik card) आणि आधारशी मतदार ओळखपत्र कसे लिंक करायचे (how to link aadhar card to voter id card) हे जाणून घेण्यासाठी लोकांनी गुगलवर खूप शोध घेतला. दरवर्षी Google 'इयर इन सर्च 2022' ही इयर एंडर लिस्ट प्रसिद्ध करते जी गेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांचा डेटा देते. गुगलने how to या विभागांतर्गत सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे हे या यादीत टॉपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पीटीआरसी चलन डाउनलोड कसा करावा हे शोधण्यात लोक व्यस्त दिसले.

कोविड लसीकरण प्रमात्रपत्र टॉपवर (Covid vaccination Certificate was searched on top)

2020 सालापासून कोरोना महामारीने केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना संकटात टाकले आहे. भारतात या आजारापासून वेगाने सुटका करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. लसीकरणाच्या दोन डोससह बूस्टर डोस देखील देण्यात आला. 2022 मध्ये, लोक Google वर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे हे जाणून घेण्याचा शोध लोक घेत होते.

शोधात तिसऱ्या क्रमांकावर मार्टिनी ड्रिंक (Martini drink at number three in searches)

गुगल लिस्टनुसार मार्टिनी ड्रिंक बाबतचा शोध या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लोकांनी मार्टिनी ड्रिंक पिण्याचा मार्ग शोधला असून हा सर्च तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्टिनी ड्रिंक हे फ्रुट फ्लेवर्ड कॉकटेल पेय आहे आणि लंडनस्थित 'लॅब लंडन बार' चे मालक डग्लस अंकारा यांनी 2002 मध्ये त्याचा शोध लावला होता. तसेच चौथ्या क्रमांकावर ई-श्रमिक कार्ड कसे बनवायचे याची माहिती लोकांनी शोधली आहे. पाचव्या क्रमांकावर, लोकांनी गर्भधारणेदरम्यान हालचालींवर नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणून घेण्यासाठी खूप शोध घेतला आहे.

व्होटर आयडी लिंक आणि आयटीआर फाइलिंग देखील टॉप सर्चमध्ये (Voter ID link and ITR filing also in top search)

Google च्या How-to List 2022 मध्ये, लोकांनी आधार कार्डला मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याच्या पद्धतीबद्दल खूप शोध घेतला. याशिवाय, How To मध्ये केळी ब्रेड बनवण्याची पद्धत देखील शोधण्यात आली आणि ITR भरण्याबाबतची माहिती देखील खूप शोधण्यात आली.