Fed Rate Hike Impact: देशांतर्गत भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकीची फेडरल बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढीच्या तयारीत आहे. जर अमेरिकेने दरवाढ केली तर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. नुकतीच फेडरल बँकेची बैठक झाली, यामध्ये व्याजदर वाढवण्यावर एकमत झाल्याची माहिती पुढे येत आहे.
अमेरिकेच्या फेडरल बँकेने 2% च्या खाली महागाई आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दरवाढ होऊ शकते. 25 बेसिस पॉइंटने दरवाढ करण्यासाठी फेडच्या बैठकीतील अनेक सदस्यांनी एकमत दर्शवले. तर काही सदस्यांनी 50 बेसिस पॉइंटने दरवाढ करण्याचे मत व्यक्त केले.
फेडरल बँकेने दरवाढ केली तर भारतावर काय परिणाम होतील? (Fed rate hike Impact on India)
फेडरल बँकेने व्याजदर वाढ केली तर परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेतील भांडवल बाजारात गुंतवणूक (foreign investor might withdrew money) करण्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे भारतासारख्या उभारी घेणाऱ्या बाजारापासून गुंतवणूकदारांचे लक्ष्य हटेल. सध्या परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. जर आणखी दरवाढ झाली तर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड होऊ शकते.
व्याजदर वाढीमुळे डॉलरचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य वाढेल. तसेच याचा परिणाम म्हणजे रुपया कमकुवत होईल. भारतासाठी आयात आणखी महाग होऊन अतिरिक्त परकीय गंगाजळी खर्च होईल. परकीय कर्ज फेडतानाही भारताला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. आयात महागल्यास किरकोळ बाजारात वस्तूंच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय कंपन्यांसाठी कर्ज महागणार( Browing will be costly for Indian companies)
भारतीय कंपन्यांना अमेरिकेतून भांडवल उभे करणे आणखी अवघड होईल. कर्ज महाग झाल्याने कंपन्यांना खर्चही वाढेल. याचा विपरीत परिणाम गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होईल.
व्याजदर वाढीचा परिणाम इंधनाचे दर (Oil price hike) वाढण्यातही होऊ शकतो. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. इंधनाचे दर वाढले तर देशात भाववाढीची शक्यता आहे. तसेच फेडरल बँकेच्या दरवाढीमुळे (Fed rate hike Impact on India) एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता येईल. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होईल. मोठ्या गुंतवणूकदारांनी भारतातून पैसे काढून घेतले नाही तरी लहान गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याची शक्यता जास्त आहे.