Tobacco Producing Farmers: तंबाखू आरोग्यास हानिकारक असली तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र, यामागे मोठे आर्थिक गणित आहे. केंद्र सरकारने नुकतेच बजेटमध्ये आयात केलेल्या सिगरेटवरील शुल्क (cigarette import duty) वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सिगरेटच्या किंमती आणखी वाढणार आहेत. तंबाखू हे नगदी पीक असून त्याचे भारतातही उत्पादन घेतले जाते. देशातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यामध्ये प्रामुख्याने तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांवर आयात शुल्काचा परिणाम होऊ शकतो.
अवैध तंबाखू व्यापारात भारत चौथ्या क्रमांकावर (illicit cigarette trade in India)
अवैध तंबाखू व्यापारात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. कायदेशीर तंबाखूच्या व्यापारापेक्षा एक तृतीयांश पेक्षा जास्त व्यापार गैरमार्गाने भारतात होतो, असे अनेक अहवालांतून समोर आले आहे. एकूण सिगरेटच्या व्यापारापैकी 38% व्यापार अवैधपणे चालतो. मागली दहा वर्षात भारतात 26 बिलियन पेक्षा जास्त अवैध सिगरेट्सच्या व्यापार झाला. म्हणजेच यातून सरकारला ना कोणताही कर मिळाला ना शुल्क. याचा फटका भारतातील तंबाखू उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे. अवैध व्यापारामुळे वैध मार्गाने पिकवलेल्या तंबाखूला योग्य बाजारभाव मिळत नाही. तसेच सरकारकडून आकारण्यात येणारा करही जास्त आहे.
तंबाखूवरील कर स्थिर ठेवण्याची मागणी (Tobacco farmer demand tax policy)
तंबाखू हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकवेळा किंमती आणि सरकारी धोरणांमधील अस्थिरतेचा सामना करावा लागतो. कोणतेही राज्य अचानक कर वाढवते, किंवा उत्पादनांवर बंदी घालते. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसाने होते. इतर शेती पिकांना जसे पूर वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो, त्यापासून तंबाखू हे पिकही सुटले नाही. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा जास्त फटका बसला आहे.
आयात शुल्क वाढीचा परिणाम काय होणार? (Impact of cigarette import on Indian tobacco farmer)
सिगरेटवरील आयात शुल्क वाढवल्याने अवैध व्यापारात आणखी वाढ होणार. या आयात केलेल्या सिगारेट तुलनेने स्वस्त असतात. मात्र, देशांतर्गंत तंबाखू वापरुन तयार केलेल्या सिगरेटची किंमत कर आणि शुल्कामुळे जास्त असते. या शेतकऱ्यांची तंबाखू विक्री येत्या काळात आणखी घटू शकते. तसेच अवैध सिगरेटच्या आयातीमुळे सरकारचा महसूलही बुडेल. सिगरेटचा अवैध व्यापार वाढल्याने गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.