Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

First Time Home Buying Mistakes: प्रथमच घर खरेदी करणार असाल, तर 'या' 5 चुका नक्की टाळा

First Time Home Buying Mistakes

First Time Home Buying Mistakes: पहिल्यांदाच घर खरेदी करताना खरेदीदाराला गुंतवणुकी संदर्भातील माहिती नसते. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्याचा त्रास त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसे होऊ नये यासाठी त्या चुका कोणत्या त्या जाणून घेऊयात.

आपल्याला हवे तसे घर खरेदी करणे वाटते तितके सोपे नाही. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक गुंतवणुकीपैकी ते एक महत्त्वाचे काम आहे. सध्या देशभरात घरांच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच परवडणारे आणि आवडणारे घर निवडणे कठिण जाऊ शकते. त्यामध्ये पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना जर पुरेसे नॉलेज नसेल, तर ते काही कॉमन चुका करतात. ज्याचा तोटा त्यांना भविष्यात भोगावा लागू शकतो. हा तोटा लाखो करोडो रुपयांमध्ये असू शकतो. बहुतांश लोक कोणत्या अशा चुका करतात, ते जाणून घेऊयात.

साईट व्हिजिटला जाताना झीरो नॉलेज असणे

तुम्ही जर ठरवले असेल, की तुम्हाला एका ठराविक एरियामध्ये घर खरेदी करायचे आहे. तर तुम्हाला त्या एरियाबद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ही माहिती असेल, तर तुम्ही सेल्स टीमकडून देण्यात आलेली माहिती खरी की खोटी तपासू शकता. बऱ्याच वेळा सेल्स टीम घरांची विक्री करण्यासाठी ग्राहकांना खोटी माहिती देतात. त्यामुळे तुम्हाला त्या एरियाची थोडी माहिती जरी असेल, तरी तुम्ही सेल्स टीमला त्यासंदर्भात प्रश्न विचारू शकता. याचा फायदा अनेक वेळा घराची फायनल डील करताना होतो.

सिबिल स्कोअर माहिती नसणे

तुम्हाला घर खरेदी करायचे असेल, तर बँका सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासतात. हा स्कोअर तपासल्यानंतरच तुम्हाला बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईटवर काही सेकंदात तपासू शकता किंवा कोणत्याही बँकेच्या लोन डिपार्टमेंटमध्ये तुमचा सिबिल स्कोअर जाणून घेऊ शकता. हा स्कोअर जाणून घेतल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम माहीत होईल. त्यानंतरच तुम्ही तुमच्या घराचे बजेट निश्चित करू शकता.

आर्थिक नियोजन न करणे

जर तुम्ही 50 लाख रुपयांचा एक फ्लॅट खरेदी करण्याचे ठरवले आहे. तर तुम्हाला 50 लाखांपैकी 20 टक्के रकमेचे डाऊनपेमेंट करावे लागेल. ही रक्कम तुमच्याकडे आहे की नाही हे तपासावे लागेल. 50 लाखाचे 20 % डाऊनपेमेंटनुसार होतात 10 लाख रुपये. हे 10 लाख रुपये तुम्ही बिल्डरला कॅशमध्ये देणार आहात की चेक स्वरूपात देणार आहात हे देखील तपासणे गरजेचे आहे. तसेच उर्वरित 40 लाख रकमेचे कर्ज घेण्याची तुमची क्षमता आहे का? हे तपासा. याशिवाय घर खरेदी करताना जे इतर खर्च येतात जसे की, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, मेंटेनन्स, पार्किंग चार्जेस इत्यादी खर्चाचे तुम्ही काय नियोजन केले आहे. याची पूर्णतः कल्पना असणे गरजेचे आहे.

बजेटनुसार प्रॉपर्टीची खरेदी न करणे

अनेकजण त्यांच्या बजेटपेक्षा जास्त कपॅसिटीची प्रॉपर्टी खरेदी करतात. यामुळे वाढीव  रक्कम कर्जदाराला फेडावी लागते. साहजिकच त्याचे हप्ते देखील दीर्घकाळ भरावे लागतात. कोणताही विचार न करता मोठी प्रॉपर्टी खरेदी करणे अनेकांना भोवले आहे. योग्य आर्थिक नियोजन नसल्याने आणि कुवतीपेक्षा जास्त कर्ज घेतल्याने भविष्यात अनेकांना खरेदी केलेले घर बँकेला परत करावे लागले आहे. त्यामुळे आपले आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन त्यानुसार घराचे बजेट निश्चित करणे गरजेचे आहे.

कागदपत्रांची नीट पडताळणी न करणे

घर हा आर्थिक गुंतवणुकीतील सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे. कागदपत्रांच्या बाबतीत डोळेझाकपणा करता कामा नये. प्रॉपर्टी संदर्भातील OC, CC, नोंदणीपत्र, स्टॅम्प ड्युटी यासारखे कागदपत्र नीट तपासायला हवेत. अनेकदा घर खरेदीदार या कागदपत्रांकडे कानाडोळा करतो त्यामुळे भविष्यात त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा बिल्डर दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या नावाने विकतात व पुढे जाऊन त्याचा त्रास घर खरेदीदाराला भोगावा लागतो.