Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buying first home: पहिलंच घर खरेदी करत असाल तर ‘या’ गोष्टींकडे नक्की लक्ष द्या!

Real Estate

Image Source : www.magicbricks.com

Buying first home: घर खरेदी करताना अनेक गोष्टी तपासाव्या लागतात. त्यातच तुम्ही पहिलंच घर खरेदी करत असाल तर आजच्या लेखात सांगितलेल्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.

Buying first home: घरं हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात पैशाची तरतूद करून घर खरेदी करण्याचा विचार करत असतो. त्यांच्या या स्वप्नाला बँका गृहकर्जाच्या(Home Loan) स्वरूपात मदत करतात. सध्या गृहकर्जाचे व्याज वाढले असले तरीही कोविडनंतर लोकांच्या गरजांमध्ये घर ही गरज प्रामुख्यने पाहायला मिळत आहे. त्यामुळेच जर तुम्ही पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या चला जाणून घेऊयात.

बजेट किती आहे?(What is the budget?)

घर घेण्यासाठी तुमचे बजेट काय आहे, या एका प्रश्नावर पुढील सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्यावरूनच घराचा आकार आणि स्थान निश्चित होते. जर तुम्ही नवीन घर होमलोनवर घेत असाल तर जितके पैसे डाऊन पेमेंट म्हणून द्याल, तितका कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. डाऊन पेमेंटसाठी तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि कर्ज किती घ्यावे लागेल? या कर्जाचा ईएमआय(EMI) दिल्यानंतर तुमच्या हातात किती पैसे राहतात या सर्वांचे मूल्यांकन करणे विसरू नका.

घराचे लोकेशन तपासणे(Checking the location of the house)

केवळ गुगल मॅपवर घराचे लोकेशन न पाहता तिथे स्वतः जाऊन ती जागा नीट तपासून घ्या. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती होते की, कामाच्या ठिकाणापासून घर अतिशय लांब असते. तसेच शहरातील सर्व सोयी सुविधा लांब असल्याने अतिशय त्रास होतो.

लोकेशनला कधी भेट द्यावी?(When to visit the location?)

हा प्रश्न थोडा विचित्र असला तरीही अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थात, सर्वजण साईट व्हिजीटसाठी सकाळच्या वेळेला प्राधान्य देतात, परंतु रिअल इस्टेट नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी, संध्याकाळ नंतरची व्हिजिट अतिशय महत्त्वाची असते.  त्यावेळी आपल्याला अनेक गोष्टी माहिती होतात. जसे की त्या ठिकाणी किती पथदिवे सुरू आहेत, कॅब, ऑटो व सार्वजनिक वाहतूक सोय कशा प्रकारे उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची लोकेशनला दिलेली व्हिजिटची वेळ देखील अत्यंत महत्त्वाची आहे

कर्ज परतफेड करण्याची क्षमता(Ability to repay the loan)

बँकांकडून जेव्हा गृहकर्ज दिले जाते, तेव्हा तुमचे  6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट तपासले जाते. तुमचे खाते रिक्त होते का तपासलेही जाते. तुम्ही प्रत्येक महिन्यात बँक खात्यात किती रक्कम शिल्लक ठेवता यावरून बँक तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता ठरवत असते.  

सिबिल स्कोअर(Sybil Score)

तुमचा सिबिल स्कोअर तुमच्या सर्व कर्जांची माहिती देतो. सिबिल आपल्या क्रेडिट कार्ड पेमेंट, जुने कर्ज किंवा कोणत्याही जुन्या डीफॉल्टबद्दल माहिती बँकेला देतो. मात्र, जर आपल्याकडे क्रेडीट कार्ड नसेल किंवा जुने कर्जही नसेल तर सिबिल स्कोअर कसा मिळणार ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर अशावेळी काळजी करू नका, कारण हा स्कोअर तेथे दिसणारच नाही, अशा प्रकरणात बँक तुमचे  स्टेटमेंट नव्या कर्जाच्या आधारावर करेल.