Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate: 'All Inclusive Price' असं बिल्डर म्हणतो तेव्हा तुम्हाला खरंच बाकी काही भरावं लागत नाही का?

Real Estate

Real Estate: तुम्हीही घर खरेदी करताना All Inclusive Price किंवा Box Price पॅकेज घेत असाल तर त्यामध्ये कोणते घटक येतात हे माहिती करून घ्या. याशिवाय हे पॅकेज घेतल्यानंतर जास्त पैसे द्यावे लागतात का हे सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Real Estate: घर घ्यायचं असलं की तुम्ही पेपरमध्ये जाहिराती(Advertise) बघायला सुरुवात करता, नाहीतर बांधकाम सुरू असलेल्या प्लॉट्सवर स्वतः व्हिजिट करता. त्यावेळी तेथील जाहिरातींकडे तुमतं लक्ष जातं. यात ठळक अक्षरात लिहिलेलं असतं, 'All Inclusive Price'. पण, याचा नक्की अर्थ काय, याचा कधी विचार केलायं. यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात हे तुम्हाला माहिती आहे किंवा यामध्ये एक्स्ट्रा पैसे बिल्डरला द्यावे लागतात का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांच्या सल्ल्याने आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर याबद्दल जाणून घेऊयात

All Inclusive Price म्हणजे नक्की काय?

रिअल इस्टेट क्षेत्रातील वरिष्ठ विपणन व्यवस्थापक श्यामल रखसिया(Senior Marketing Manger, Shyamal Rakhasiya) सांगतात की, All Inclusive price ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी तयार करण्यात आलेली एक विपणन पद्धत(Marketing strategy) आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, यामध्ये ग्राहकांना घर खरेदी करताना जो एकूण खर्च येतो त्यांना एकत्रित करून एक पॅकेज तयार केले जाते त्यालाच All Inclusive Price म्हणतात.  
तर रिअल इस्टेट सल्लागार श्री. संग्राम पाटील(Real Estate Consultant, Sangram Patil) सांगतात की, All Inclusive Price ला रिअल इस्टेट क्षेत्रात 'बॉक्स प्राईज(Box Price)' असं सुद्धा म्हणतात. यामध्ये वेगेवेगळे घटक एकत्र करून एक बॉक्स प्राईज तयार केली जाते. ज्यामुळे ग्राहकांना घर घेण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी बिल्डर All Inclusive Price असं सांगतो त्यावेळी या पॅकेजमध्ये सांगण्यात आलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम बिल्डर खरेदीदाराकडून घेऊ शकत नाही. रिअल इस्टेटमधील वरिष्ठ विपणन अधिकारी आणि सल्लागार या दोघांच्या मते 5 महत्त्वपूर्ण घटक 'All Inclusive price' किंवा 'बॉक्स प्राईज(Box Price)' पॅकेजमध्ये यायलाच हवेत.

All Inclusive Price पॅकेजमध्ये येणारे 5 महत्त्वाचे घटक कोणते?

मालमत्तेची प्रति चौरस फूट किंमत(Property price per square foot)

मालमत्तेची मूळ किंमत(Basic Price) व त्याची प्रति चौरस फूट(Per sq ft) असणारी किंमत या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेली असते. बाजारपेठेतील मालमत्तेचा चालू दर आणि मालमत्तेचे एकूण क्षेत्र याची चौरस फूट किंमत बिल्डर या पॅकेजमध्ये समाविष्ट करतो.

सोसायटी अँड डेव्हलपमेंट चार्ज(society and development charge)

मालमत्तेसोबत पुरवण्यात येणाऱ्या सुविधा जसे की लाईट मीटर(Light Meter), पाण्याच्या कनेक्शनसाठी(Water Connection) येणार खर्च, सोसायटी मेंटेनन्स(Society Maintenance) यासारखे घटक सोसायटी अँड डेव्हलपमेंट चार्ज अंतर्गत घेतले जातात. त्यामुळे बिल्डर हे चार्ज देखील याच पॅकेजमध्ये समाविष्ट करतो.

मालमत्तेवर आकारला जाणारा जीएसटी(GST)

मालमत्तेवर आकारला जाणारा जीएसटी(GST) देखील या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेला असतो. मात्र यामध्ये देखील एक गोम आहे, जर त्या मालमत्तेस OC(Occupancy Certificate) मिळाली नसेल तर GST भरावा लागतो याउलट जर OC मिळाली असेल तर GST भरावा लागत नाही. खरेदी केलेली मालमत्ता 45 लाखाच्या आतील असेल तर अग्रीमेंट व्हॅल्यूच्या 1 टक्के GST आकारला जातो, याउलट मालमत्ता 45 लाखांच्या वरील असेल तर 5 टक्के GST आकारला जातो. त्यामुळे GST ची ही रक्कम याच All Inclusive price मध्ये समाविष्ट करण्यात आलेली असते.

स्टॅम्प ड्युटी चार्ज(Stamp duty Charge)

कोणतीही मालमत्ता खरेदी करताना त्याचा स्टॅम्प ड्युटी चार्ज(Stamp duty Charge) भरावा लागतो. थोडक्यात समजून घ्यायचे तर यामध्ये सरकारला या मालमत्तेसंदर्भात इतर कर भरावे लागतात. बाजारभावानुसार आणि त्या त्या शहरातील किंवा निमशहरातील स्टॅम्प ड्युटी चार्जनुसार याचे पैसे आकारले जातात, त्यामुळे मालमत्तेचा स्टॅम्प ड्युटी देखील या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेला असतो.

मालमत्ता नोंदणी शुल्क(Registration Charges)

मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी येणार खर्च म्हणजेच Registration Charges  देखील या All Inclusive price पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत.

तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर All Inclusive price पॅकेज किंवा बॉक्स प्राईज पॅकेज घेताना या सर्व गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि मगच घर खरेदी करा.