Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ICC T-20 World Cup Prize Money: विजेती टीम होणार मालामाल, ICC कडून लाखो डॉलर्सची खैरात

T20 World Cup 2022 Prize Money, T20 World Cup

Image Source : www.twitter.com

ICC T-20 World Cup Prize Money: ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेली आयसीआयसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. आज आणि उद्या या मालिकेतली सेमिफायनल मॅचेस होणार आहे. भारत सेमिफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे.टी-20 वर्ल्ड कप विजेती टीम यंदा कोट्याधीश होणार आहे.

ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेली आयसीआयसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. आज आणि उद्या या मालिकेतली सेमिफायनल मॅचेस होणार आहे. भारत सेमिफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे. T-20 वर्ल्ड कप विजेती टीम यंदा कोट्याधीश होणार आहे. ((ICC T-20 World Cup Final Winner will get Huge Price Money)

सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या टीमला घसघशील रक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.येत्या रविवारी 13 नोव्हेंबर 2022 रोजी  वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान,न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघामध्ये लढत होणार आहे. यातील दोन विजेत्या रविवारी फायनलमध्ये भिडणार आहेत. (ICC T-20 World Cup Final on 13th Nov 2022)

टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला यंदा ICC कडून वर्ल्ड कप आणि 16 लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. भारतीय चलनात विजेत्यांना  13 कोटी 11 लाख 72 हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 6 कोटी 55 लाख 86 हजार रुपये मिळणार आहेत.ICC यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 45.68 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात वाटणार जाईल.

T-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 16 ऑक्टोबर 2022 पासून पहिल्या फेरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 ही दुसरी फेरी सुरु झाली. या स्पर्धेत भारतासह 15 संघ सहभागी झाले आहेत. T-20 विश्वचषकातील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे.

अशी आहेत बक्षीसे

चॅम्पियन: 13 कोटी 11 लाख 72 हजार  रुपये
उपविजेते : 6 कोटी 55 लाख 86 हजार रुपये
उपांत्य फेरी: 3 कोटी 29 लाख 48 हजार रुपये (प्रत्येकी 4 लाख डॉलर्स)
सेमिफायनलमधील पराभूत टीमला 
सुपर 12 चा एक विजय: 32 लाख 62 हजार 
सुपर 12 मधून बाहेर पडल्यावर: 57 लाख 08 हजार 
पहिली फेरी जिंकल्यावर: 32 लाख 62 हजार रुपये
पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यावर: 32 लाख 62 हजार रुपये