Hurun Global Rich List: संपत्तीत 20 टक्के किंवा 21 अब्ज डॉलरर्सची घट होऊनही, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी 82 अब्ज डॉलरर्स संपत्तीसह जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये कायम आहेत. 2023 M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी अंबानींनी सर्वात श्रीमंत आशियाईचा किताब कायम राखला.
Table of contents [Show]
गौतम अदानी पोहचले श्रीमंतांमध्ये 23 व्या क्रमांकावर
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि कुटुंब 53 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 35% किंवा 28 अब्ज डॉलर्सच्या घसरणीसह याच यादीत 23 व्या क्रमांकावर पोहोचले. अदानी यांनी 2023 मध्ये दुसरे सर्वात श्रीमंत आशियाई खिताबही गमावला. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गने जानेवारीमध्ये अदानी समूहाची अनागोंदीविषयी अहवाला जाहीर केल्याने अदानींच्या शेअर्सला फटका बसला होता. अदानी यांनी 60% अधिक संपत्ती गमावली.
सायरस पूनावालांच्या संपत्तीत 4% वाढ
2022 मध्ये दररोज 1600 कोटी रुपयांची कमाई करुन अदानी या यादीत अव्वल स्थान मिळवेल होते. जगातील अव्वल 50 श्रीमंत उद्योजकांमध्ये इतर भारतीय बिलेनिअर्स देखील आहेत. सायरस पूनावाला ( 46 वे स्थान, संपत्ती 27 अब्ज डॉलर्स) आणि शिव नाडर आणि कुटुंब (50 वे स्थान, 26 अब्ज डॉलर्स). विशेष म्हणजे, ज्यांच्या संपत्तीत 4 टक्क्यांनी वाढ झाली असे पूनावाला वगळता टॉप 100 श्रीमंतांमध्ये इतर सर्व भारतीय बिलेनिअर्सच्या संपत्तीत घट झाली.
बिलेनिअर्स ज्यांनी एक अब्जाहून अधिक डॉलर्स गमावले
2022 M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टच्या अगदी उलट, संपत्तीच्या कमतरतेच्या बाबतीत भारत लीग टेबलमध्ये अव्वल आहे. चीन आणि यूएस सारख्या देशांमध्ये अनुक्रमे 178 आणि 123 अब्जाधीश आहेत; ज्यांनी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गमावले आहे. तर 2023 च्या M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतात 41 अब्जाधीश आहेत, ज्यांनी 1 अब्जाहून अधिक डॉलर्स गमावले आहे.
रेखा राकेश झुनझुनवाला ग्लोबल रिच लिस्टमध्ये टॉप 16 स्थानावर
गेल्या वर्षभरात 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक रकमेची भर पडलेल्या अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताने 16 अब्जाधीश जोडले आणि तिसरे स्थान पटकावले. आणि इटलीने यावर्षीच्या यादीत 9 बिलेनिअर्स समावेश केला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत नवीन प्रवेशकर्ता, रेखा राकेश झुनझुनवाला आणि कुटुंब, 2023 M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टमध्ये टॉप 16 वर म्हणजेच नवीन भारतीय प्रवेशकर्त्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. Hurun Indiaचे एम.डी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, 'M3M Hurun ग्लोबल रिच लिस्ट 2023 उद्योजकांच्या नजरेतून सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेची वास्तविकता दर्शविते.