दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणार्या उत्पादनांची निर्मिती करणारी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या कंपनीने गुरूवारी (दि. 27 एप्रिल) 2022-23 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची माहिती प्रसिद्ध केली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पन्नात मार्च तिमाहीमध्ये 10.81टक्क्यांनी वाढ झाली असून, कंपनीचे उत्पन्न 15,053 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षात कंपनीचे याच तिमाहीतील उत्पन्न 13,584 कोटी रुपये इतके होते.
या वर्षभरात कंपनीच्या एकूण उत्पन्नात 9.6 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न 2552 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीचे नेट प्रॉफिट 2327 कोटी इतके होते. या वर्षात कंपनीचे नेट प्रॉफिट 225 कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्स 22 रुपयांचा लाभांश (Dividend) जाहीर केला आहे.
कंपनीकडून लाभांश जाहीर
2022-23 या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्स 22 रुपयांचा लाभांश (Dividend) देण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी कंपनीने 17 नोव्हेंबर 2022 रोजी प्रति शेअर्स 17 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. कंपनीच्या प्रॉफिटमध्ये वाढ झाली असली, तरीही कंपनीच्या उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. चौथ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हरचे उत्पन्न 15,277 कोटी रुपये, तर नेट प्रॉफिट 2584 कोटी रुपये असेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. उत्पादनांच्या किमती वाढल्याने कंपनीच्या उत्पन्नात 9% वाढ होईल, तर व्रिकीमध्ये 5% वाढ अपेक्षित होती. पण ही वाढ फक्त 5 टक्के झाली आहे.
सध्या कंपनी ग्रॉस मार्जिन वाढवण्यासोबत उत्पादनांच्या जाहिराती करण्यावर आणि गुंतवणूक वाढण्यावरही भर देत आहे. सध्या बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेता उत्पादनाची विक्री किंमत योग्य असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच कंपनीच्या मिड टर्म ते लॉन्ग टर्म व्हॅल्यू क्रिएशन मॉडेलमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची माहिती दिल्यानंतर कंपनीचा शेअर मार्केट बंद होताना कंपनीचा शेअर्स 1.68 टक्क्यांनी घसरला आहे.
Source: hindi.moneycontrol.com