Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HUL Q3 Results: हिंदुस्तान युनिलिव्हरने तिमाहीत 2505 कोटींचा नफा कमावला, मात्र निकालापूर्वीच शेअर घसरले

HUL Q3 Results

Image Source : www.in.fashionnetwork.com

HUL Q3 Results: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या घरात, पिढ्यान-पिढ्या वावरत असलेली कंपनी, एफएमसीजी क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या तिमाहिचा निकाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. कंपीनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेमके निकालात काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

HUL Q3 Results, seen growth in Net Profit & sales: रोजच्या वापरातील गरजेच्या आणि उपयुक्त वस्तू अर्थात एफएमसीजी प्रोडक्टस बनवणारी प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL: Hindustan Unilever)! कंपनीने नुकतेच डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीचा निकाल किंवा अहवाल (Hindustan Unilever December Quarter Results) प्रसिद्ध केला आहे.  कंपनीने 12 टक्के निव्वळ नफा मिळवला असून तो 2 हजार 505 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. कंपनीने निव्वळ विक्रीत 16 टक्क्यांची झेप घेतली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.61 टक्क्यांची घसरण झाली होती.

12 टक्के निव्वळ नफा कमावला (Earned a net profit of 12%)

हिंदुस्थान युनिलिव्हरने गुरुवारी, 19 जानेवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की, वार्षिक आधारावर त्यांचा निव्वळ नफा (Net profit) 12 टक्क्यांनी वाढून 2 हजार 505 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 2 हजार 243 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कंपनीने निव्वळ नफा मिळवला आहे. त्याच वेळी, कंपनीने सप्टेंबर 2022 ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 20 टक्क्यांनी वाढवून 2 हजार 616 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

विक्री 16 टक्क्यांनी वाढली (Sales increased by 16 percent)

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या आकडेवारीनुसार, तिसर्‍या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 16 टक्क्यांनी वाढून 14 हजार 986 कोटी रुपयांवर गेली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 12 हजार 900 कोटी रुपये होती. त्यामुळे कंपनीच्या वाढीत मोठी झेप घेतली आहे.

शेअर्स निकालापूर्वी घसरले (Shares fell ahead of the results)

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल येण्यापूर्वीच कंपनीचा शेअर बाजारात तेजीसह उघडला. गुरुवारी, 19 जानेवारी रोजी बाजार उघडताच हिंदुस्थान युनिलिव्हरचा शेअर 2 हजार 670.10 रुपयांच्या किमतीसह उघडला. पण संध्याकाळपर्यंत, एचयूएलचा शेअर 1.61 टक्क्यांनी म्हणजे 43.15 रुपयांनी घसरला आणि प्रति शेअर 2 हजार 643.05 रुपयांवर बंद झाला.

हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ आणि एमडी संजीव मेहता म्हणाले की, आम्ही नजीकच्या काळात आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महागाईचा सर्वात वाईट टप्पा आमच्या मागे आहे. ग्राहकांच्या मागणीत हळूहळू सुधारणा व्हायला हवी. आम्ही आमचा व्यवसाय आक्रमकपणे व्यवस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि निरोगी श्रेणीत मार्जिन राखून आमचे ग्राहक वाढवणे सुरू ठेवतो.