भारतीय बनावटीच्या खेळण्यांना अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसते आहे. तसेच खेळणी उत्पादनात विदेशातील कंपन्यांनी उत्सुकता दर्शविल्याचे सरकारने म्हटले आहे.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (Department for Promotion of Industry and Internal Trade) याबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे. खेळणी बनवणाऱ्या देशांतर्गत उत्पादकांना सहाय्य देण्यासाठी या विभागाद्वारे प्रयत्न केले जात असतात. अलीकडच्या काळात अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारद्वारे अनेक पावले उचलली जात आहे. भारतीय खेळणी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य देऊन, परदेशात खेळण्यांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.
प्लेग्रो टॉईज इंडियाचे प्रमोटर आणि टॉय असोसिएशन ऑफ इंडियाचे (Toy Association of India) अध्यक्ष मनू गुप्ता यांनी खेळणी उद्योगात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल माध्यमांना माहिती दिली आहे. गेल्या वर्षात अमेरिकेतल्या किरकोळ व्यापाऱ्यांनी सुमारे 400 दशलक्ष डॉलरची खेळणी विकत घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली. भारतीय बनावटीच्या खेळण्यांना जागतिक बाजारपेठे लाभावी आणि मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी सरकार देखील प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
Top global firms approaching Indian?? toy makers for sourcing goods: Official
— Chamber of Commerce, Sust.Dev. & Foreign Relations (@ChamberIndia) April 12, 2023
"@DPIITGoI officials are helping the industry engage with these world players and get orders."@CimGOI | @PiyushGoyal | @DoC_GoI | @dgftindia | @makeinindia
?https://t.co/pAzlUjPDjt pic.twitter.com/VjplTku0Rp
कुशल कामगारांची किमया
गेल्या काही वर्षांपूर्वी देशात कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहे. याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात कुशल कामगार खेळणी उत्पादन क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढली आहे आणि पर्यायाने विदेशात भारतीय बनावटीच्या खेळण्यांना मागणी वाढते आहे.
'मेड इन इंडिया' खेळणी जगभरात
सरकारी पातळीवर खेळणी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय बनावटीची खेळणी जगभरात जावी यासाठी उत्पादक कंपन्या देखील स्वतःच्या पातळीवर कार्यरत आहेत. परंतु खेळण्यांची बाजारपेठ अजूनही भारतीयांना नवीच आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय खेळण्यांची म्हणावी तितकी मागणी नाहीये, याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावर जाहिरातीचा असलेला अभाव. भारत सरकारने याबाबतीत सहकार्य केल्यास जागतिक बाजारपेठ काबीज करणे भारताला सोपे जाईल असे देखील मनू गुप्ता यांनी म्हटले आहे. येणाऱ्या काळात खेळणी व्यवसायात भारत चीनला देखील मागे टाकेल असा विश्वास देखील गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
करोडोंची उलाढाल
एप्रिल-डिसेंबर 2022-23 दरम्यान देशातील खेळण्यांची निर्यात 1,017 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती मनू गुप्ता यांनी दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात ही निर्यात 2,601 कोटी रुपये इतकी होती.
गेल्या काही वर्षांत परदेशी खेळण्यांची आयात घटली असून देशातही भारतीय बनावटीच्या खेळण्यांना मागणी असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. फेब्रुवारी 2020 मध्ये खेळण्यांवरील आयात शुल्क 20 टक्क्यांहून 60% करण्यात आले आहे.परदेशी खेळण्यांवर अधिक आयात शुल्क लावल्यामुळे त्यांच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे महाग खेळणी घेण्यापेक्षा भारतीय बनावटीची खेळणी घेणे लोक पसंत करतायेत.