Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple iPhone 15 च्या निमित्ताने रिलायन्सचा कसा वाढेल महसूल? जाणून घ्या प्रकरण

Apple

ॲपलचे देशातील पहिले रिटेल स्टोअर मुकेश अंबानींच्या मालकीच्या Reliance Jio world Drive Mall सुरु करण्यात आले आहे. हे स्टोअर ॲपलने भाडेतत्वावर घेतले आहे. या करारात रिलायन्सने एक महत्वाची अट टाकली आहे, त्यामुळे ॲपलच्या उत्पादनांचा खप वाढल्यास रिलायन्सचा महसूलात देखील वाढ होणार आहे.

भारतात ॲपलचे पहिले रिटेल स्टोअर मुंबईत सुरु झाले आहे. मुंबई पाठोपाठ दिल्लीतही ॲपल रिटेल स्टोअर सुरु झाले आहे. मुंबईतील बेकेसी येथील रिलायन्स मॉलमधील ॲपलचे रिटेल स्टोअर मात्र चर्चेचा विषय ठरतो आहे. येत्या काही दिवसांत ॲपल Apple iPhone 15, Apple iPhone 15 Pro लाँच करणार आहे. मुंबईकरांना आता थेट ॲपल रिटेल स्टोअरमध्ये हा मोबाईल खरेदी करता येणार आहे.

बेस्ट फीचर्स असलेला हा स्मार्टफोन हातोहात विकला जाईल असा अंदाज आहे. ॲपल सोबतच रिलायन्स ग्रुपला देखील या विक्रीचा फायदा होणार आहे.

आता तुम्ही म्हणाल ॲपल आणि रिलायन्सचा नेमका संबंध काय? प्रश्न अगदी बरोबरच आहे, मात्र रिलायन्सने ॲपल स्टोअरसाठी भाडेतत्वावर जागा देताना काही अटी घालून दिल्या आहेत, त्यामुळे ॲपलची विक्री वाढताच रिलायन्सच्या महसुलामध्ये देखील वाढ होणार आहे.

काय आहे करार?

ॲपलचे देशातील पहिले रिटेल स्टोअर मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये (Reliance Jio world Drive Mall) सुरु करण्यात आले आहे. हे स्टोअर ॲपलने भाडेतत्वावर घेतले आहे. या करारात रिलायन्सने एक महत्वाची अट टाकली आहे. यानुसार ॲपलला पहिल्या तीन वर्षांसाठी रिलायन्स जिओ मॉलला महसुलातील 2% महसूल वाटा द्यावा लागणार आहे.

याचाच अर्थ ॲपल स्टोअरचा महसूल जितका वाढेल त्याच्या 2% रक्कम ही रिलायन्सला द्यावी लागणार आहे. म्हणजेच Apple iPhone 15, Apple iPhone 15 Pro लाँच झाल्यानंतर रिलायन्सला देखील याचां आर्थिक लाभ मिळणार आहे.

महिन्याला भाडे किती?

मिडीया रिपोर्टनुसार ॲपल रिटेल स्टोअर आणि रिलायन्सच्या भाडेकरारानुसार ॲपल रिटेल स्टोअर रिलायन्सला महिना 42 लाख रुपये भाडे देणार आहे. म्हणजेच वर्षाला 5.04 कोटी रुपये भाडे रिलायन्सला मिळणार आहे. याशिवाय दर महिन्याला ॲपलच्या वेगवेगळ्या उत्पादनांची जेवढी विक्री होईल त्यातील 2% रक्कम देखील रिलायन्सला मिळणार आहे.