अनेक वेळा उन्हाळ्यात कडक उष्णतेमुळे कारवर विपरीत परिणाम होत असतात आणि त्यामुळे कारचा रंग जाण्याची व टायर फुटण्याची भीती असते. अशा परिस्थितीत कारची काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
एप्रिल महिना सुरू होऊन दोन दिवस उलटले असून आता उष्णतेचे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे.उष्णतेची तीव्रता कमी असली तरी, तुमच्या वाहनाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. जाणून घ्या उष्णतेपासून कारचे संरक्षण कसे करता येईल अनेक वेळा कडक उन्हामुळे व सूर्यकिरणांमुळे गाडीवर दुष्परिणाम होतो व गाडीचा रंग उडणे व टायर फुटण्याची भीती निर्माण होते. इतकेच नाही तर अति उष्णतेमुळे गाडीला आग लागण्याची देखील भीती असते.
Table of contents [Show]
या चुका करू नका (Don't Make These Mistakes)
उन्हात कार पार्क करण्याची बहुतेक लोकांना सवय असते. जास्त वेळ उन्हात कार पार्क केल्याने गाडीचा रंग खराब होऊ शकतो. याशिवाय गाडी धुण्यासाठी उन्हात उभी ठेवू नका कारण असे करत असताना तुम्ही वापरत असलेले कापड खाली पडले आणि त्याचा पुन्हा वापर केला तर गाडीचा रंग खराब होऊ शकतो.
कार पॉलिश करून रंगाचे संरक्षण (Protecting the Colour by Polishing the Car)
उन्हाळ्यात वाहनांच्या रंगाला मोठा धोका असतो. हे टाळण्यासाठी, कारला अल्ट्राव्हायोलेट यूव्ही कोटिंगसह पॉलिश करा. यामुळे कारचा रंग कधीही खराब होणार नाही. याशिवाय एखाद्या पक्ष्याने वाहनावर घाण केली तर ती साफ करताना पॉलिशमुळे रंग खराब होण्याची शक्यता कमी होते.
सनशेडचा वापर करा आणि टायर तपासा (Use the sunshade and check the tires)
एवढेच नाही तर कडक उष्णतेचा कार विंडशील्डवर परीणाम होतो व उन्हाळ्यात गाडीच्या टायरमधील दाब वाढू लागतो. अशा परीस्थितीत टायर फुटण्याची शक्यता वाढते. यावर नियंत्रण म्हणून कार खरेदीदार ट्यूबलेस टायर वापरू शकतो किंवा टायर्सची नियमित तपासणी करून घेऊ शकतो. आठवड्यातून एकदा तरी गाडीचे टायर्स तपासणे आवश्यक आहे.
कूलंटची विशेष काळजी घ्या (Take special care with the coolant)
इंजिन थंड ठेवण्यासाठी कारमधील कूलंट महत्वपूर्ण काम करते. अशा वेळी नेहमी उन्हाळा सुरू झाला की सर्वप्रथम कूलंटची तपासणी करून घ्यावी. कूलंट कारचे इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. सनशेड वापरल्याने कारमधील प्लास्टिकचे संरक्षण होईल आणि ते वितळण्यापासून किंवा फुटण्यापासून बचाव होईल.
(News Source : www.zeebiz.com)