Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Summer Heat Protection Products: तळपत्या उन्हापासून करा स्वत: चा बचाव; कूलिंग टॉवेल्स आणि वेस्टबद्दल कधी ऐकलंय?

Summer Heat Protection Products

उन्हाचा जोर वाढला असून सूर्य जणू आगच ओकत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच तापमाननं कहर केला. देशातील बहुतांश भागात सरासरी चार ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान जास्त होतं. आता मार्च महिना सुरू असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक स्मार्ट प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तळपत्या उन्हातही कूल ठेवतील.

उन्हाचा जोर वाढला असून सूर्य जणू आगच ओकत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच तापमाननं कहर केला. देशातील बहुतांश भागात सरासरी चार ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान जास्त होतं. आता मार्च महिना सुरू असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक स्मार्ट प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. कूलिंग टॉवेल्स, वेस्ट आणि हायड्रेशन पॅक्स सोबत अशी अनेक उत्पादनं आहेत, ज्यामुळे तुम्ही स्वत:ला या उन्हाळ्यात कूल ठेवू शकता.

महाराष्ट्रात मागील वर्षात 25 व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त लाइव मींट न्यूज मीडियाने दिले आहे. संपूर्ण भारतातील हा आकडा तर आणखी मोठा असू शकतो. उन्हामुळे उलट्या, जुलाब, मळमळ, चक्कर यासारखे त्रास तर अनेकांना होतात. त्यामुळे जर सूर्य डोक्यावर आला असताना घराबाहेर पडत असाल तर तुम्ही स्वत:ची काळजी घेण्यासाठी स्मार्ट उत्पादने वापरायला हवीत. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. पाहूयात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बाजारात कोणकोणती उत्पादने उपलब्ध आहेत.

कूलिंग टॉवेल्स (Cooling towels) (how Cooling towel works)

उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण मोठा हातरूमाल किंवा गमजा गळ्याभोवती गुंडाळतात किंवा डोक्याला गुंडाळतात. त्याऐवजी तुम्ही कूलिंग टॉवेल वापरू शकता. हे टॉवेल एका उच्च दर्जाच्या मटेरियलपासून बनवलेले असतात. तुमच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी याची मदत होऊ शकते. हे कूलिंग टॉवेल evaporative cooling या वैज्ञानिक तत्वानुसार काम करतात. या टॉवेलमध्ये पाणी असते. (how Cooling towel works) जेव्हा तुम्ही टॉवेल गळ्याभोवती गुंडाळून उन्हात जाल तेव्हा यातील पाण्याचे बाष्पीभवन होईल. बाष्पीभवन होताना थंड हवा बाहेर पडून तुमच्या गळ्याला आणि खांद्यांना थंड करेल. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होईल.

हे कूलिंग टॉवेल polyvinyl acetate (PVA), polyester microfiber, आणि polyester सारख्या मटेरियलपासून बनवलेले असतात. या कापडामध्ये मॉइश्चर शोषूण घेण्याची क्षमता असते. मान आणि डोक्याच्या मागील भागाला जास्त ऊन लागते. त्यामुळे चक्कर किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते कूलिंग टॉवेलमुळे तुमची माग झाकून राहील तसेच खांद्यांपर्यंत तापमान कमी होण्यास मदत होईल.

कूलिंग टॉवेलची किंमत किती( Price of cooling towel) 

तुम्हाला कूलिंग वेस्ट ऑनलाइन तसेच कपड्यांच्या दुकानातही मिळेल. याची किंमत 200 रुपये ते 1000 रुपयापर्यंत असू शकते. तसेच विविध ब्रँडनुसार किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये बाहेर निघताना किंवा काम करत असताना मानेवर कूलिंग टॉवेल ठेवून तुम्ही स्वत: चे हीटपासून संरक्षण करू शकता.

कूलिंग वेस्ट/जॅकेट (Cooling vests)

कूलिंग टॉवेल गुंडाळून तुम्ही मान आणि खांद्यांचे उन्हापासून संरक्षण करू शकता. मात्र, शरीराचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता तुम्ही कूलिंग वेस्ट वापरू शकता. हा एक शॉर्ट जॅकेटचाच प्रकार आहे. याद्वारे तुम्ही उन्हापासून बचाव करू शकता. हे कूलिंग वेस्ट दोन प्रकारामध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

1) बाष्पीभवनावर आधारित कूलिंग वेस्ट (Evaporative Cooling vests)

Evaporative Cooling vests हे एका खास मटेलिअल पासून बनलेले जॅकेट असते. हे तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घालू शकता. पाणी या जॅकेटमध्ये शोषले जाते. तुम्ही हे जॅकेट खालून उन्हामध्ये गेल्यास बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होईल. असे होत असताना तुमच्या शरीराला थंडावा जाणवेल. तुम्हाला जर दिवसभर उन्हामध्ये राहावे लागत असेल किंवा काम करावे लागत असेल तर हे जॅकेट फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहील.

2) आइस पॅक कूलिंग वेस्ट ( Ice pack Cooling vests)

आइस पॅक कूलिंग वेस्ट हे एक असे जॅकेट असते ज्यामध्ये तुम्ही आइस पॅकेट्स ठेवू शकता. पोटाचा पाठीचा आणि खांद्याच्या भागामध्ये फ्रीजमध्ये थंड केलेले आइस पॅक्स ठेवता येतात. त्यामुळे तुमच्या शरीराला आतून थंडावा मिळतो. काही जॅकेट्समध्ये पाणी भरून तुम्ही त्याला फ्रिजमध्ये आधी कूल करून घेऊ शकता. दिवसभर थंड राहण्याची क्षमता या जॅकेट्समध्ये असते. आइस पॅक्समुळे तुमच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. 

summer-heat-protection-products-smart-summer-protection-products-ever-heard-of-cooling-towels-vests-and-hydrash-packs-1.jpg

www.premiersafety.com

जर तुम्हाला दिवसभर उन्हामध्ये काम करावे लागत असेल किंवा गाडीवर प्रवास करत असाल तर असे जॅकेट्स तुमचे दिवसभर उन्हापासून संरक्षण करतील. शरीराचे तापमान कमी ठेवून तुमचा हीट स्ट्रोकपासून बचाव होईल. हलक्या रंगाचे हे कूलिंग वेस्ट जास्त फायद्याचे ठरतील. तसेच हे एकदम हलके आणि पातळ असल्याने यावरुन शर्टही घालू शकता. या जॅकेट्सची रचना जाळीदार असते. ज्यामुळे हवा आतमध्ये जाऊ शकते.

कूलिंग वेस्टची किंमत किती (Price Of cooling vest)

कूलिंग वेस्टची किंमत दीड हजार रुपयांपुढे आहे. चांगल्या ब्रँडचे कूलिंग जॅकेट घ्यायला गेला तर थोडे जास्त पैसे मोजायची तयारी ठेवा. मात्र, तुम्हाला या जॅकेट्सची गुणवत्ताही चांगली असेल. जर तुम्हाला उष्म्याचा अति त्रास असेल तर चांगल्या गुणवत्तेचे जॅकेट तुमचा उन्हापासून बचाव करेल. स्ट्रोक, चक्कर आणि इतर उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कूलिंग जॅकेट हा चांगला पर्याय आहे.