Financial Savings For Retirement : प्रत्येकालाच आयुष्यात कामामधून लवकरात लवकर सुटका हवी असते. बहुतेक लोकांना लवकर निवृत्त होऊन आरामदायी जीवन जगायचे असते. परंतु हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. यासाठीच बचत आणि सेवानिवृत्तीनंतरचे योग्य नियाजन करावे लागते. महत्वाचे म्हणजे नियोजन सगळेच करतात. मात्र योग्य नियोजन करुन ते अंमलात आणणे फार महत्वाचे असते.
सेवानिवृत्तीचे एक निश्चित असे वय असले तरी बहुतेकांना त्यापूर्वीच निवृत्त व्हायचे असतात. काहींना सफारी करायची असते. काहींना आपली फिरण्याची आवड पूर्ण करायची असते. तर काहींना आपले विविध छंद जोपासायचे असते. त्यामुळे या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी आणि जोपासण्यासाठी नोकरी करीत असतांनाच पूरेशी बचत करणे आवश्यक आहे. तर लवकर निवृत्त होऊन आपल्या मनासारखे जगण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा, ते जाणून घेऊया.
FIRE मेथडचा वापर करा
लवकर निवृत्त होण्याच्या एका अतिशय उपयुक्त मार्गाला फायर पद्धत म्हणतात. FIRE म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवा आणि लवकर निवृत्त व्हा. आर्थिकदृष्ट्या मुक्त आणि मजबूत असलेला माणूस लवकर निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे तज्ञ असे सांगतात की, वयाच्या 40 वर्षापर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे, गरजेचे आहे.
उत्पन्नाचा अधिकाधिक भाग वाचवा
आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बचत करणे सर्वात महत्वाचे आहे. आपल्याला पाहिजे तसे जीवन जगण्यास बचत करणे, हा सगळ्यात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. बचतीची सवय लहान वयापासूनच लागायला पाहिजे. आपल्या उत्पन्नातील जास्तीत जास्त रक्कम बचतीच्या स्वरुपात जमा करा.
खर्च कमी करा आणि बचत जास्त करा
आर्थिकदृष्ट्या सबळ राहण्यासाठी आपले खर्च कमी करुन बचत करणे गरजेचे आहे. सोबतच आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कुटुंबियांसोबत मिळून एखादी उद्योग करु शकता. चांगली नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करु शकता.