Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Students Personal Finance: कॉलेजमध्ये शिकत असताना आपले पर्सनल फायनान्स कसे सांभाळाल?

Master Student Personal Finance

Student Personal Finance Managment: कॉलेजमध्ये शिकत असताना बचत, गुंतवणूक आणि एकूणच आपले पर्सनल फायनान्स कसे सांभाळायचे? याची तुम्हाला माहिती नसेल. पण हेच दिवस कॉलेजचे लाईफ एन्जॉय करत तुमच्या भविष्याला आकार देत असतात. त्यामुळे या काळात तुमच्याकडून मेजर चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.

Personal Finance of Students: कॉलेज म्हटले की, दंगा करण्याचा, स्वत:च्या आवडीच्या गोष्टी करण्याचा,  करिअरचा मार्ग शोधण्याचा, मित्रांसोबत मौजमस्ती करण्याचा काळ असतो. या काळात आर्थिक बचत करणे, गुंतवणूक करणे, पर्सनल फायनान्सचे नियोजन करणे लक्षातही येत नाही आणि याचा विचार केला तरी ते खूप बोरिंग वाटते. पण, याच काळात तुमच्या हातून झालेल्या चुका तुमच्या भविष्यावर, तुमच्या लाईफवर मोठा परिणाम करु शकतात. त्यामुळे फ्युचर लाईफचा लेसन हा कॉलेजच्या लाईफपासूनच समजून घ्यायला हवा. यासाठी मनी मॅनेजमेंट जाणून घेणे गरजेचे आहे.

बचत करायला शिका

अनेक देशांमध्ये आजच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. हे शिक्षण घेण्यासाठी म्हणजे त्याची फी भरण्याचे तीन पर्याय तुमच्यासमोर आहेत. एक म्हणजे शिष्यवृत्तीतून मिळणारे पैसे, दुसरे वडिलांनी दिलेले पैसे आणि तिसरा पर्याय म्हणजे एज्युकेशनल लोन. ज्यांच्याकडे पहिले दोन पर्याय उपलब्ध नाहीत. त्यांना कर्जाचा पर्याय निवडावा लागतो. पण एकदा का तुमचे शिक्षण पूर्ण झाले की, बँका व्याजासह पैसे घ्यायला तयार असतात. यावेळी जर तुम्हाला नोकरी मिळाली असेल, तर उत्तम. मात्र जर का तुम्हाला नोकरी मिळण्यास उशीर होत असल्यास, तुम्ही कॉलेजमध्ये असताना बचत केलेले पैसे अशावेळी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे याता एक प्रॅक्टिकल प्लॅन तयार करा.

खर्चावर नियंत्रण ठेवा

कॉलेज लाईफ म्हटली की, मौजमजा मस्ती करण्याचा काळ असतो. महागड्या वस्तू खरेदी करणे, मित्रांसोबत फिरणे, बागडणे, शॉपिंग करणे सुरु असते. अशावेळी भावनांवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कमीतकमी खर्च करून बचत करण्याची सवय अंगी बाळगणे गरजेचे आहे. ही सवय जर अंगात भिनली तर तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची आणि खर्चांवर ताबा ठेवण्याची सवय शेवटपर्यंत राहील.

स्वत:चा इन्शुरन्स काढा

महाविद्यालयीन जीवनात बचत करुन, तुम्ही तुमची एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढा. या इन्शुरन्स पॉलिसीचा तुम्हाला फायदा तर होईलच. पण यासाठी तुम्हाला खूप पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. कमी वयात इन्शुरन्स पॉलिसी काढली तर त्याची प्रीमिअमही कमी भरावा लागतो. त्याचबरोबर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर, तुमचा आजारामागे होणारा आकस्मात खर्च देखील टळेल आणि याची तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आर्थिक मदत होईल.

गुंतवणुकीला प्राधान्य द्या

पैशाचे मूल्य सर्व परिस्थितीत समान राहात नाही. ते कालांतराने बदलते. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तुम्ही जर का बॉण्ड्स आणि शेअर्सच्या वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचे मूल्य वाढेल, जे तुमच्यासाठी त्यावेळी देखील फायदेशीर ठरेल.

सावधगिरी बाळगा

तरुणांची गरज लक्षात घेता मायक्रोलोन्स अ‍ॅप्सची संख्या वाढत आहे. मायक्रोलोन्स अ‍ॅ प्स कमी कागदपत्रांसह झटपट कर्ज मिळवू देतात. पण हे अ‍ॅप विश्वासार्ह नसतात. अशा फसव्या अ‍ॅप पासून दूर राहणे कधाही चांगले. तुम्हाला मायक्रोलोन्स अ‍ॅ प्सवर विश्वास ठेवायचा असल्यास, फक्त RBI कडे नोंदणीकृत असलेल्या विश्वसनीय अ‍ॅप्स सोबत व्यवहार करण्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या तारुण्यात, कॉलेज जीवनात आपल्या गरजा आणि परिस्थिती पाहून परिस्थिती हाताळल्यास तुमचे लाईफ आनंदी आणि चिंतामुक्त होऊ शकेल.