Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Use Of Credit Card : क्रेडिट कार्डचा सर्वोत्तम वापर कसा करुन घ्याल ?

Best Use Of Credit Card

Credit Card : योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरल्यास आणि आपले बील वेळेवर भरल्यास, आपला क्रेडिट स्कोअर तयार होते. मात्र असे न केल्यास आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो.

Best Use Of Credit Card : डिजिटल इंडियाच्या काळात क्रेडिट कार्डचा प्रचंड वापर होतो. केवळ शहरातीलच लोकं नाही तर ग्रामीण भागातील अनेक लोकं क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करतांना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.

कार्ड घेण्यापूर्वी नियम समजून घ्या

क्रेडिट कार्ड हे बँक किंवा वित्तीय संस्थेद्वारे दिल्या जाते. या कार्डद्वारे आपण एका मार्यादित रक्कमेपर्यंत खरेदी करु शकतो किंवा इतर गोष्टींसाठी बिल चुकते करण्यास आपण या कार्डचा वापर करीत असतो. मात्र असे करीत असतांना, क्रेडिट कार्डची पैसे खर्च करण्याची लिमीट किती आहे आणि त्याचे नियम काय आहेत? यावर देखील लक्ष देणे गरजेचे असते. क्रेडिट कार्ड वापरुन आपण एक प्रकारे कर्ज घेत असतो. कार्डधारक एक प्रकारे कार्डचा वापर करुन बँक किंवा संबंधित वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असते. त्यामुळे कार्डधारकाने मूदत तारखेच्या पूर्वी जर का संबंधित क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल चूकते केले तर, त्याला त्यावर कुठलेही व्याज आणि इतर संबंधित शुल्क भरावे लागत नाही. क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय आहेत, जाणून घेऊया.

50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी

क्रेडिट कार्ड वापरताना, तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे खर्च करत नाही; तुम्ही बँकेचे पैसे खर्च करता. शिवाय, तुम्ही दिलेल्या महिन्यात खर्च केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ५० दिवसांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिट कालावधी दिला जातो. त्यामुळे तुम्ही काही काळ तुमच्याकडे पैसे नसतांना सुध्दा आपली गरज आणि ईच्छा दोन्ही पूर्ण करु शकता.

रिवॉर्डस

क्रेडिट कार्ड वापरताना, रिवॉर्डस मिळणे हा क्रेडिट कार्डचा सर्वात महत्वाचा फायदा आहे. तुम्ही खरेदी करण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा, तुमचा कार्ड जारीकर्ता तुम्हाला बक्षीस देतो. हे रिवॉर्डस तुमच्या कार्डच्या वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट,कॅशबॅक,एअर माइल आणि इतर फायदे मिळू शकतात.

CIBIL स्कोअर वाढवू शकता

तुमचा बँकेबाबतचा चांगला क्रेडिट इतिहास म्हणजे बॅंका तुम्हाला क्रेडिट कार्ड,कर्जे आणि बरेच काही यांसारखी क्रेडिट उत्पादने कमी व्याजदराने देऊ करतील. तम्ही क्रेडिट कार्ड वापरले आणि तुमची बिले वेळेवर भरली, तर तुमचा CIBIL स्कोअर वाढवू शकतो, तुमचा क्रेडिट इतिहास मजबूत बनु शकतो.

महत्वाचे लाभ मिळतात

क्रेडिट कार्ड वापरण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे फसवणूक रोखणे होय. अनेक क्रेडिट कार्ड मुळातच सर्वांगीण संरक्षणासह येतात. म्हणजे त्यात तुमची फसवणूक होणार नाही, याची सर्वोपरी काळजी,तुम्हाला देतांनाच  घेतल्या जाते.

क्रेडिट कार्ड वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे विमा सुरक्षा.अनेक क्रेडिट कार्ड वैयक्तिक अपघात विमा, प्रवास विमा, खरेदी संरक्षण आणि बरेच काही यासारखे विविध विमा फायदे देतात. मात्र, त्या विमा लाभांच्या बँकेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. सुपर-प्रिमियम किंवा लक्झरी क्रेडिट कार्ड वापरल्याशिवाय, हे विमा फायदे अनेकदा निरुपयोगी असल्याचे तुम्हाला आढळून येईल .