Sovereign gold bond scheme: जागतिक मंदी, दरवाढ, महागाई, राजकीय तणाव यामुळे आगामी काळात मोठ्या अर्थव्यवस्थांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत बाजारात घसरण झाली तर सोन्याकडे आकर्षण वाढू शकते. गुंतवणूकदारांसाठी सोने हे महत्वाचे ठरू शकते. सध्या तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. सरकार पुढील आठवड्यापासून स्वस्त सोन्याची विक्री सुरू करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) (RBI) 2 टप्प्यात सॉवरेन गोल्ड बॉन्ड लागु करणार आहे. याची सिरिज 19 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडली जाईल. तर पुढच्या टप्प्यात ते 6 ते 10 मार्च दरम्यान उघडले जाईल. RBI भारत सरकारच्या वतीने हे बॉन्ड लागु केले जातात. यामध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, जे तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना ठराविक कालावधीसाठी वेळोवेळी जारी केली जाते.
Table of contents [Show]
- सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय? (What is Sovereign Gold Bond?)
- सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक कशी करावी? (How to invest in sovereign gold bonds?)
- सॉवरेन गोल्ड बॉन्डमधील गुंतवणुकीची मर्यादा (Investment Limits in Sovereign Gold Bonds)
- सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे (Advantages of Sovereign Gold Bonds)
- सॉवरेन गोल्ड बॉन्डवरील कर नियम काय आहेत? (What are the tax rules on sovereign gold bonds?)
- गोल्ड बॉन्डवर परतावा (Returns on Gold Bonds)
सॉवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय? (What is Sovereign Gold Bond?)
सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड ही सरकारी योजना आहे. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. 2015 मध्ये, सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड सुरू केले.
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक कशी करावी? (How to invest in sovereign gold bonds?)
- बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन (Online and offline) खरेदी करू शकता.
- ऑनलाइन खरेदीवर फ्लॅट रु.50/ ग्रॅम सूट.
- पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करता येईल.
- स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करणे शक्य आहे.
- बीएसई, एनएसईच्या (BSE, NSE) प्लॅटफॉर्मवरूनही खरेदी शक्य आहे.
- बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लॉकिन कालावधी 8 वर्षे.
सॉवरेन गोल्ड बॉन्डमधील गुंतवणुकीची मर्यादा (Investment Limits in Sovereign Gold Bonds)
- तुम्ही किमान 1 ग्रॅमच्या युनिटमध्ये गुंतवणूक करू शकता.
- गुंतवणुकीची कमाल मर्यादा 4 किलो.
- वैयक्तिक, HUF साठी 4 किलोची कमाल गुंतवणूक मर्यादा.
- ट्रस्टसाठी जास्तीत जास्त 20 किलो गुंतवणुकीची मर्यादा.
- संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा.
सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे (Advantages of Sovereign Gold Bonds)
- व्याज 2.5% प्रतिवर्ष, व्याज अर्धवार्षिक दिले जाते.
- GST अंतर्गत नाही, फिजिकल सोन्यावर 3% GST.
- तसेच गोल्ड बॉन्डमध्ये ट्रान्सफरचे ऑप्शन आहे.
- बाँडवर कर्ज घेऊ शकता.
- शुद्धतेची कोणतीही समस्या नाही.
- मुदतपूर्तीनंतर कर नाही.
- घरी ठेवण्याचा त्रास नाही.
सॉवरेन गोल्ड बॉन्डवरील कर नियम काय आहेत? (What are the tax rules on sovereign gold bonds?)
- 8 वर्षांनंतर पैसे काढण्यावर कोणताही भांडवली नफा कर नाही.
- गोल्ड बाँडवरील व्याजाची रक्कम करपात्र आहे.
- मुदतपूर्व पैसे काढण्यावर कॅपिटल गेन टॅक्स.
- बाँड हस्तांतरणावर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ.
गोल्ड बॉन्डवर परतावा (Returns on Gold Bonds)
- 8 वर्षात 20% व्याज मिळेल.
- गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळते.
- पैसे काढल्यानंतर सोन्याच्या बाजार दरावर आधारित पेमेंट.
- व्याज व्यतिरिक्त, सोन्याच्या तेजीचा फायदा देखील आहे.