• 07 Dec, 2022 10:06

Monthly 2 Lakh Pension after Retirement: निवृत्तीनंतर महिना 2 लाख रुपये पेन्शन, कशी मिळेल जाणून घ्या

Pension, Investment in Pension Scheme, Retirement Planning

Monthly 2 Lakh Pension after Retirement : आपल्यासमोर अनेक गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध असतात. कुठला पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे याबाबत सारासार विचार करुन आणि नोंदणीकृत वित्तीय सल्लागारांशी चर्चा करुन निर्णय घेणे योग्य ठरेल.

गुंतवणुकीचे नियोजन करताना रिटायरमेंटनंतरच्या कालावधीचा विचार करणे आवश्यक असते. ज्यादिवशी आपल्या नोकरीची सुरुवात होते तेव्हापासून याचे नियोजन करणे आदर्श मानले जाते. यामुळे रिटायर होईपर्यंत तुमचे जास्तीत जास्त पैसे जमा होऊ शकतील. यामुळे वृद्धापकाळ सुरक्षित होऊ शकतो. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हा यासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो.

निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी  केंद्र शासनाकडूनही वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात. त्या माध्यमातून आपल्याला गुंतवणूक करता येते. तुम्हीही नोकरी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की रिटायरमेंटनंतर एक मोठी रक्कम तुम्हाला मिळावी तर गुंतवणूकीसाठी शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे आदर्श मानले जाते.

निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. यामुळे साठीत पोचताना आपल्याला मोठा आर्थिक आधार मिळतो. यासाठी इपीएफ, एनपीएस, शेअर बाजार, मुच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा पर्यायांचा विचार केला जातो. यापैकी एनपीएस ही योजना काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.  

'एनपीएस' स्कीम काय आहे? What is NPS Scheme?  

‘एनपीएस’ म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये इक्विटी आणि डेब्ट या दोन्हीचा सहभाग असतो. नॅशनल पेन्शन स्कीमला सरकारकडून गॅरंटी मिळते. रिटायरमेंटनंतर जास्त प्रमाणात पेन्शन मिळण्यासाठी या स्कीमचा विचार केला जातो.

एनपीएस टियर 1 आणि टियर 2 अशा दोन प्रकारचे असते. टियर 1 मध्ये कमीत कमी गुंतवणूक 500 रुपये इतकी असते तर टियर 2 मध्ये कमीत कमी 1 हजार रुपये इतकी असते. कमीत कमी किती रक्कम यात गुंतवावी लागते हे जरी यात निश्चित असले तरी जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवावी याची कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणूकदाराला यामध्ये इक्विटी, कार्पोरेट डेट आणि सरकारी बॉन्ड असे तीन पर्याय असतात.

अशी मिळेल 2 लाख रुपये मासिक पेन्शन (NPS Return Calculator)

या स्कीममध्ये  40 वर्षापर्यंत  दर महिन्याला 5 हजार रुपये जमा केल्यावर  गुंतवणूकदाराला 1 कोटी 91 लाख  रुपये इतकी रक्कम मुदतपूर्वीवेळी (Maturity Amount) होईल. याची गुंतवणूक केल्यावर 2 लाख इतकी मासिक पेन्शन मिळू शकते. अशी आकडेवारी सर्वसाधारण गृहितकांवर आधारलेली  व माहितीसाठी असते. आपल्यासमोर अनेक गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध असतात. कुठला पर्याय तुमच्यासाठी  योग्य आहे याबाबत सारासार विचार करुन आणि नोंदणीकृत वित्तीय सल्लागारांशी चर्चा करुन निर्णय घेणे योग्य ठरेल.