आर्थिक वर्ष 2022-23 आणि असेसमेंट वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2023 आहे; अर्थात जोपर्यंत सरकार ही तारीख वाढवत नाही. तोपर्यंत 31 जुलै अंतिम तारीख आहे. त्यामुळे करदात्यांना किंवा सर्वसामान्यांना या अंतिम तारखेपर्यंत ऑफलाईन (ITR Offline Filing) आणि ऑनलाईन पद्धतीने रिटर्न भरता येणार आहे.
ऑफलाईन आयटीआर भरण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत साईटवरून आयटीआर फॉर्म डाउनलोड (Offline ITR Filing Download) करणं आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागाने ऑनलाईन मोडमध्ये भरलेला फॉर्म ऑफलाईनमध्ये भरण्याचे (ITR Offline Utility) नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. ज्यात एखादी व्यक्ती ऑनलाईन मोडमध्ये भरलेला ड्राफ्ट ITR फॉर्म इम्पोर्ट करू शकते. जर एखाद्याने त्यांचे रिटर्न (ITR-1 आणि ITR-4 फॉर्म) ऑनलाईन मोडमध्ये अंशतः भरलेले असतील आणि त्यांना आता ऑनलाईनवरून ऑफलाईनमध्ये फाईल करायचे असेल तर, खालील टप्प्यांद्वारे तुम्ही ITR फाईल करू शकता.
ITR ऑफलाईन फाईल करण्याचे टप्पे (ITR Offline Filing Steps)
1. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. डाऊनलोड या टॅब अंतर्गत -आयटी रिटर्न प्रिपरेशन सॉफ्टवेअर अंतर्गत योग्य आयटीआर ई-फाईल फॉर्म डाउनलोड करा
2. डाउनलोड केलेली ZIP फाईल एक्सट्रॅक्ट करा आणि एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमधून युटिलिटी उघडा
3. ITR फॉर्मसाठी आवश्यक असणारी माहिती भरा. त्यानंतर ITR फॉर्मचे सर्व टॅब व्हॅलिडेट करा आणि लागू होणारा टॅक्स आयडेंटिफाईड करा.
4. XML फाईल तयार करून सेव्ह करा. त्यानंतर यूजर आयडी (पॅन), पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून ई-फायलिंग पोर्टलवर लॉग-इन करा.
5. 'ई-फाइल' मेनूवर क्लिक करा आणि 'इन्कम टॅक्स रिटर्न' लिंक निवडा.
इन्कम टॅक्स रिटर्न पेजवरील प्रक्रियेसाठी काही टप्पे
1. इन्कम टॅक्स रिटर्न पेजवर पॅनकार्ड स्वत:हून पॉप्युलेट होईल.
2. ओपन झालेल्या पेजवर असेसमेंट वर्ष आणि तुम्हाला लागू असलेला ITR फॉर्म निवडा
3. फायलिंग प्रकारातून ओरिजनल/रिव्हाईस्ड रिटर्न निवडा
4. सबमिट मोड सिलेक्ट करून अपलोड XML वर क्लिक करा.
5. त्यानंतर डिजिटल सही (DSC), आधार ओटीपी किंवा बॅंक इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) यापैकी कोणताही एक पर्याय वापरून ITR व्हेरिफाय करा.
6. सबमिट केलेला ITR फॉर्म हा तुमच्या खात्यामधून नंतरही व्हेरिफाय करता येऊ शकतो किंवा सही केलेला ITR-V फॉर्म इन्कम टॅक्स विभागाच्या बंगळुरू येथील ऑफिसला पाठवावा लागतो.
7. त्यानंतर continue या पर्यायावर क्लिक करून शेवटी ITR सबमिट करा.
ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरून कोणीही ITR-1 आणि ITR-4 फॉर्म भरू शकतात. वेबसाईटवर तुम्ही भरत असलेली माहिती वेळोवेळी Save Draft या बटणावर क्लिक करून सेव्ह करा. साईटवर सेव्ह केलेला ड्राफ्ट सेव्ह केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत किंवा रिटर्न भरण्याच्या तारखेपर्यंत त्यात कोणताही बदल होत नाही.
आयटीआर ऑनलाईन फाईल करण्याचे टप्पे (ITR filing online process)
1. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. वापरकर्त्याचा आयडी (पॅन नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
3. त्यानंतर E-File मेनूमध्ये जाऊन 'इन्कम टॅक्स रिटर्न'वर क्लिक करा.
इन्कम टॅक्स रिटर्न पेजवर ITR फाईल करण्याचे टप्पे
1. इन्कम टॅक्स रिटर्नच्या पेजवर पॅनकार्ड ऑटोपॉप्युलेट होईल.
2. तिथे असेसमेंट वर्ष आणि तुम्हाला लागू असलेला ITR फॉर्म निवडा
3. फायलिंग टाईपमधून ओरिजनल/रिव्हाईस्ड रिटर्न पर्याय निवडा
4. त्यानंतर सबमिशन मोडमधून प्रिपेअर आणि सबमिट ऑनलाईन हा पर्याय निवडा
5. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा आणि फॉर्म व्यवस्थित भरला आहे याची खात्री करा.
6. फॉर्म व्यवस्थित भरला आहे, याची खात्री करून तो व्हेरिफाय करा.
7. भरलेला आयटीआर आधार ओटीपी, ई-व्हेरिफाय, प्री-व्हॅलिडेटेड बॅंक अकाऊंट आणि प्री-व्हॅलिडेटेड डी-मॅट अकाऊंट द्वारे व्हेरिफाय करता येईल.
8. व्हेरिफाय केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.