Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्समध्ये आयटीआर 4 काय आहे? जाणून घ्या ITR-4 फॉर्म, रचना आणि पात्रता

ITR form 4 income tax return

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-4 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

ITR-4 हा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) प्रक्रियेतील एक फॉर्म आहे. ITR-4 ला सुगम फॉर्म (Sugam Form) म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकार अशा करदात्यांसाठी आहे; ज्यांनी संभावनीय उत्पन्नाची योजना इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 44AD, कलम 44AE आणि कलम 44ADA अंतर्गत निवडली आहे. तसेच ज्यांचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त नाही. पण त्याचवेळी सदर व्यावसायिकांची उलाढाल 2 कोटी रूपयांपेक्षा अधिक जास्त असल्यास त्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना ITR-3 दाखल करावा लागेल.


ITR-4 दाखल करणे कोणाला आवश्यक आहे?

वैयक्तिक व्यक्ती/हिंदू अविभक्त कुटंब (HUF)/भागादारीतील व्यावसायिक यांनी रिटर्न फाईल करताना ITR-4 भरायचा आहे. तसेच ज्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नात खालील उत्पन्नाचा समावेश होतो. ते ITR-4 दाखल करू शकतात.

  • इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 44AD किंवा कलम 44AE अंतर्गत येणाऱ्या व्यवसायातील उत्पन्न
  • कलम 44ADA अंतर्गत गणना केलेल्या व्यवसायातील उत्पन्न
  • पगार किंवा पेन्शनद्वारे ज्यांचे उत्पन्न 50 लाखांपर्यंत जाते
  • 50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या एका घराच्या मालमत्तेचे उत्पन्न
  • इतर स्त्रोतांद्वारे 50 लाख रूपयांपर्यंत मिळणारे उत्पन्न (लॉटरी आणि घोड्याच्या शर्यतींमधून मिळणारे उत्पन्न वगळून)

वर नमूद केलेल्या व्यवसायात फ्री-लान्सर हे येत असतील आणि त्यांची वार्षिक जमा 50 लाखांपेक्षा अधिक नसेल तर ते ITR-4 दाखल करू शकतात.

कोणाला ITR-4 भरणे गरजेचा नाही?

  • ज्याचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे; उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये पगार/घराची मालमत्ता किंवा इतर स्त्रोत यांचा समावेश होतो. ते ITR-4 दाखल करू शकत नाही.
  • एखादी व्यक्ती कंपनीत संचालक आहे आणि त्याने इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे; ती व्यक्ती हा फॉर्म दाखल करू शकत नाही.
  • वैयक्तिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) किंवा भागीदारी व्यवसायांतर्गत त्यांच्या अकाऊंट खात्याच्या पुस्तकांचे (Account Books) इन्कम टॅक्स कायदा, 1961 अंतर्गत ऑडिट केले जाते, ते सुद्धा ITR-4 दाखल करू शकत नाही.

ITR-4 फॉर्मची रचना काय आहे?

ITR-4 फॉर्म हा भाग अ, ब, क, आणि ड अशा 4 मुख्य भागांमध्ये आणि 5 शेड्युल्समध्ये विभागण्यात आला आहे. प्रत्येक भागाबाबत आपण अधिक जाणून घेऊया.

भाग अ मध्ये करदात्याचे नाव, जन्मदिनांक, राहण्याचा पत्ता याप्रकारची माहिती असते.

ITR-4 FORM SUGAM PART A

भाग ब मध्ये पगार, मालमत्ता व इतर स्त्रोत अशा 5 प्रकारच्या मिळकतीमधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची माहिती असते.

ITR-4 FORM PART B

भाग क मध्ये वजावट आणि एकूण करपात्र उत्पन्न असते.

ITR-4 FORM PART C

भाग ड हा टॅक्स कशाप्रकारे आणि किती लागला हे दर्शवतो.

ITR-4 FORM PART D

या 4 मुख्य भागानंतर 5 शेड्युलचे विवरण द्यावे लागते. ते शेड्युल खालीलप्रमाणे असतात.

  • शेड्युल बीपी (Schedule BP) : व्यवसाय किंवा विशिष्ट प्रोफेशनमधून कलम 44AD, 44ADA आणि 44EA मधील तरतुदीनुसार मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील
  • शेड्युल आयटी (Schedule IT) : आगाऊ टॅक्स आणि स्व-मूल्यांकन टॅक्स भरणाऱ्याची माहिती
  • शेड्युल टीसीएस (Schedule TCS) 
  • शेड्युल टीडीएस-1 (Schedule TDS-1) 
  • शेड्युल टीडीएस-2 (Schedule TDS-2)

ITR-4 फॉर्म कसा भरायचा?

आयटीआर-4 फॉर्म (ITR-4 Form) हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येऊ शकतो. तो कसा भरायचा याबाबत आपण सविस्तरपणे समजून घेऊ.

ITR-4 फॉर्म ऑफलाईन भरण्याची पद्धत

ITR-4 फॉर्म हा फक्त पुढील प्रकरणांमध्ये ऑफलाईन फाईल करता येऊ शकतो. तुमचे वय 80 किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास आणि तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसल्यास आणि तुम्ही रिटर्न फाईल करून परतावा मागणार नसल्यास ऑफलाईन रिटर्न फाईल करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष ITR-4 हा फॉर्म मिळवून तो भरून बोर-कोडेड पद्धतीने रिटर्न भरावा लागेल. संबंधित विभागाकडे याची कागदपत्रे पोहोचली की, विभागाकडून पावती दिली जाते.

ITR-4 ऑनलाईन भरण्याची पद्धत

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही ITR-4 फॉर्म भरू शकता. सदर फॉर्म भरल्यानंतर तो व्हेरिफाय करणं हे तितकंच गरजेचं आहे. अन्यथा इन्कम टॅक्स विभागाकडून हा फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही. तो व्हेरिफाय करण्यासाठी डिजिटल सही, इव्हीसी कोड, आधार ओटीपी किंवा इन्कम टॅक्स विभागाच्या बंगळुरू येथील पत्त्यावर पाठवून व्हेरिफाय करता येऊ शकतो.