Build Credit From Scratch: कर्ज देण्याआधी कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था कर्जदाराची पत पाहते. जर तुम्ही कर्ज फेडू शकता, असा विश्वास वाटला तरच तुम्हाला कर्ज मिळते. अन्यथा तुमचे कर्ज नाकारले जाईल. तुम्ही जर पहिल्यांदाच घर घेण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला कर्ज का देईल हा विचार करा. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर कर्ज मिळण्याचा शक्यता कमी असते. हा स्कोअर तुम्ही योग्य नियोजनाने वाढवू शकता.
जर भूतकाळातील निष्काळजीपणामुळे, चुकांमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खाली आला असेल किंवा आर्थिक व्यवहार जास्त नसल्याने क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्ही तो वाढवू शकता. गृहकर्ज घेताना चांगला क्रेडिट स्कोअर हवाच. मग शुन्यापासून जर क्रेडिट स्कोअर वाढवायचा तुम्ही विचार करत असाल तर या लेखात तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही जर नुकतेच शिक्षण संपवून नोकरी करत असाल आणि भविष्यात स्वत:चे घर घ्यायचा विचार करत असाल तर आतापासून चांगला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याच्या मागे लागा. अन्यथा एनवेळी कर्ज मागायला गेल्यास नकार मिळेल.
सर्वसाधारणपणे 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला समजला जातो. एवढ्या स्कोअरवर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, त्यापेक्षा कमी स्कोअर असेल तर तुम्हाला नकार मिळू शकतो. त्यामुळे या मॅजिक नंबरच्या पुढे तुमचा क्रेडिट स्कोअर कसा नेऊ शकता हे पाहू.
1)सिक्युअर्ड क्रेडिट कार्डला अॅप्लाय करा
सिक्युअर्ड म्हणजेच सुरक्षित क्रेडिट कार्डसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुमची क्रेडिट हिस्ट्री नसेल किंवा क्रेडिट स्कोअर अत्यंत कमी असेल तर तुम्ही या कार्डसाठी अप्लाय करू शकता. तुमच्या बँकेतील मुदत ठेवींच्या आधारावर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जाते. बँकेत तुमची मुदत ठेव असल्यामुळे असे कार्ड तुम्हाला सहज मिळू शकते. या कार्डद्वारे जर तुम्ही खरेदी, बिल पेमेंट केले आणि हप्ता वेळेवर भरला तर हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये दिसून येईल. जर चांगला क्रेडिट स्कोअर नसेल तर तुम्हाला रेग्युलर क्रेडिट कार्ड मिळू शकणार नाही. अशा वेळी सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड चांगला पर्याय ठरतो. स्टुटुंड क्रेडिट कार्डसाठीही तुम्ही अप्लाय करू शकता. तरुण वयातच क्रेडिट स्कोअर वाढवण्याचा हा चांगला पर्याय आहे.
2) अॅड ऑन क्रेडिट कार्ड
जर तुमची काहीही क्रेडिट हिस्ट्री नसेल तर तर तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या मित्राच्या क्रेडिट कार्डशी संल्गन अॅड ऑन कार्ड घेऊ शकतात. असे कार्ड घेताना तुमची पात्रता पाहिली जाणार नाही. मात्र, या कार्डद्वारे तुम्ही केलेले खर्च तुमचे स्कोअर वाढवण्यास मदत करतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने कार्ड असेल तर त्या कार्डला जाडून अॅड ऑन कार्ड खरेदी करा.
मात्र, ज्या मूळ क्रेडिट कार्डशी तुम्ही अॅड ऑन कार्ड खरेदी करत आहात त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असायला हवा. अन्यथा, तुमचा क्रेडिट स्कोअरही खाली जाऊ शकतो. तसेच अॅड ऑन क्रेडिट कार्डचा गैरवापर किंवा पेमेंट लेट करू नका. नाहीतर तुमचा स्कोअर खाली जाईल.
3) क्रेडिट बिल्डर लोन (क्रेडिट स्कोअर वाढवणारे कर्ज
जर तुम्ही आधी कधीही आर्थिक व्यवहार केलेल नसतील आणि तुमचा क्रेडिट स्कोअर अत्यंत कमी असेल तर तुम्ही क्रेडिट बिल्डर लोन घेऊ शकतात. हे पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या कर्जापेक्षा वेगळे आहे. सर्वसामान्यपणे तुम्हाला जेव्हा वित्तसंस्थेकडून कर्ज मान्य होते तेव्हा ते तुमच्या खात्यात लगेच जमा होते. आणि तुम्ही नंतर कर्जाचे हप्ते भरता. मात्र, क्रेडिट बिल्डर लोनमध्ये कर्जदार संस्था आधी तुमचे बचत खाते उघडते. या खात्यात कर्जाची रक्कम हस्तांतरित करते. मात्र, हे पैसे तुम्हाला लगेच मिळत नाही. कर्जाचे सर्व हप्ते तुम्हाला आधी भरावे लागतील. त्यानंतरच कर्जाची रक्कम खात्यातून काढता येईल. ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे ते अशा प्रकारचे कर्ज घेऊन क्रेडिट स्कोअर वाढवू शकतात. कारण, अशा व्यक्तींना वित्तीय संस्था कमी क्रेडिट स्कोअर असल्याने कर्ज देण्यास नकार देईल. मात्र, क्रेडिट बिल्डर लोन सहज मिळू शकते.