Biyane Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना राबविली जात आहे. खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अनुदानावर दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे. बियाणे अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 प्रकारचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यातील एक म्हणजे प्रमाणित बियाण्यांचे वाटप आणि दुसरे म्हणजे पीक प्रात्यक्षिक बियाण्यांची वाटप करणे होय. पिक प्रात्यक्षिकमध्ये त्याकरिता लागणारे खत तसेच औषधी इत्यादी एका गावातील काही शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दिले जाते. प्रमाणित बियाणे मध्ये प्रामाणिक असणाऱ्या बियाण्यांच्या किट वाटप करण्यात येतात.
अनुदानावर कोणती बियाणे मिळतील आणि अनुदान किती मिळेल?
या योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामात लागणारी सर्व बियाणे मिळतील. कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग या व्यतिरिक्त खरिपाची इतर बियाणेसुद्धा मिळतील. वरील बियाणांचे वाटप बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत करण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. बियाणे वाटप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. तसेच पिक प्रात्यक्षिकासाठी जास्तीत जास्त 4000 रुपये एकरी इतके अनुदान मिळेल.
अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी फार्मर अधिकृत वेबसाइट ओपन करावी लागेल.
- ओपन झालेल्या पेजवर शेतकरी योजना या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर आधार ओटीपीच्या माध्यमातून किंवा युजरनेम टाकून आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- आता तुमची सर्व प्रोफाइल पूर्ण भरा शेत जमिनीची माहिती टाका तसेच पिकांची माहिती उपलब्ध असेल तर टाका.
- आता तुम्हाला बी-बियाणे खाते औषधे या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर बियाणे अनुदान योजनेचा अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता बियाणे पाहिजे ते निवडून घ्या.
- तुम्हाला हवे असलेले किती बियाणे पाहिजे हे सर्व माहिती भरून अर्ज तुमचा सबमिट करा.
- त्यानंतर पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा एसएमएस येईल.